महत्वाच्या बातम्या
-
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज - फडणवीस
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास सुप्रीम कोर्टाने सकारात्मक निकाल दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा आहे असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत तपास प्रकरणी ठाकरे सरकारला धक्का | पार्थ म्हणाले सत्यमेव जयते!
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ | मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मराठा आरक्षण मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची मागणी विरोधकांकडून होतेय. दरम्यान अशोक चव्हाण नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. पण याच पार्श्वभुमीवर त्यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आलीय. मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातील इतर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ११ हजार ११९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ४२२ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आज उच्चांकी ४२४ रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात ११ हजार ११९ नवे रुग्ण आढळले. तर ९ हजार ३५६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख १५ हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५६ हजार लोक उपचार घेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीची आत्महत्या
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती धीरज राणे,पत्नी सुषमा राणे 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी वण्या अशी मयतांची नावे आहे. पत्नीने गळफास घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला
महाराष्ट्रात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून सुरू झालेला तिढा थेट असून संपला नाही आहे. विद्यापीठाला युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. हा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. आगामी तीन दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सुप्रीम कोर्टात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ईश्वर हा सर्वत्र आहे | त्यामुळे धार्मिक स्थळांबाबत थोडी सबुरी बाळगू - आरोग्यमंत्री
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळं बंद आहेत. पण राज्य अनलॉकच्या टप्प्यात असताना मंदिरं का उघडण्यात आली नाही? असा सवाल थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला. त्यानंतर आता मशिदी पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री अस्लम शेख हे पुढे आहेत. मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर अभ्यासू आणि कार्यश्रम डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यात शाळांबाबत निर्णय | शिक्षणमंत्र्यांची माहिती
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
पार्थ पवार भाजपमध्ये येणार नाहीत आणि आले तरी आम्ही घेणार नाही - खा. गिरीश बापट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगली होती. पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ११,१११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २८८ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज दिवसभरात राज्यात 11,111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 288 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक अडचणींमुळे कुटुंबीयांची आणि राज ठाकरेंची माफी मागत शहराध्यक्षाची आत्महत्या
अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेच्या किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मनसेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनील ईरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणींमुळे राहत्या घरात आत्महत्या केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस कोरोना पॉझिटिव्ह | एकाचा मृत्यू
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार २९० झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले ९ हजार ८५० जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३१५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत | आ. रोहित पवार यांची मागणी
अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही | मात्र त्यांचे मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजित बदल्या पुढे ढकलण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर तात्काळ पलटवार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे | देवेंद्र फडणवीस यांचा टोला
आम्हाला सध्या राजकारणापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की, राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाविकासघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. बदल्यासंदर्भात जे काय सुरू आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
स्वपक्षीय आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून बनाव, गुलाबराव पाटील बरसले
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी या प्रकरणात योग्य तपास करण्यात येत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तसंच याच मुद्द्यावरून ठाकरे सरकार अडचणीत येईल, असाही दावा कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC'च्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार | महत्वाचा निर्णय
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो | राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार जेव्हा राज्यपालांचं स्वागत करण्यास पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत चांगलीच कोपरखळी अजितदादांना लगावली.
5 वर्षांपूर्वी -
ते त्यांचे वैयक्तिक मत असावे | शिवसेनेने दिलेला त्रास आम्ही कधीही विसरणार नाही - संतोष धुरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पाठराखण केली. मात्र, समाज माध्यमांवर अविनाश जाधव यांना झालेल्या त्रासापासून ते अनेक प्रकरणांचा हवाला देत महाराष्ट्र सैनिक यावरून असहमती दाखवत आहेत. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या राजकारणामुळे अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. मात्र शिवसेनेतून नेहमी आपल्या विरोधातच सुरु असतो, मग आपले नेते त्यांच्या पाठीशी का उभे राहतात तेच समजत नाही असं कार्यकर्ते समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH