महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्ती हे सरकारचं नाटक, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीला विरोध - प्रकाश आंबेडकर
युद्ध असले तरीही निवडणुका घेतल्याच पाहिजेत असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. एवढंच नाही तर करोना हे सरकारचं नाटक असल्याचाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. करोनाच्या नावाने सरकार आपलंच राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
आम्हाला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही - फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घातली आहे. तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
१२,५३८ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य गृहविभागाला आदेश
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. कारण, राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
इयत्ता ८वीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात कुर्बान हुसेन यांच्या उल्लेखाबाबत बालभारतीचं स्पष्टीकरण
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात मोठी चूक झाल्याचं उघडकीस आहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन शिक्षणातून काहीच समजत नसल्याच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या
कोल्हापूरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १०५ पैकी काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - यशोमती ठाकूर
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे १०५ पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
5 वर्षांपूर्वी -
कर्मचारी महिला पदवीधर टंकलेखक, पालिका आयुक्त सांगायचे घरी झाडू-भांडी घासायला
पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना अपशब्द केल्याप्रकरणी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला विरार पोलिसांनी काल अटक केली होती. मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन करत पालिका आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! राज्यात आज ८६४१ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१ एकूण रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या चोवीस तासांत २६६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यात ३.९४ टक्के मृत्यूदर असल्याचं सांगण्यात येतय. तर आज ५५२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बारावी निकाल: रिचेकिंग करायचं आहे? उत्तरपत्रिकेची प्रत हवी? - ही आहे प्रक्रिया
बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.
5 वर्षांपूर्वी -
बारावीच्या निकालात कोकण अव्वल, एकूण निकालात मुलींची यंदाही बाजी
बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीत महाजॉब्स योजनेवरून पुन्हा ठिणगी...काँग्रेसकडून प्रश्न
महाविकासआघाडीत पुन्हा एकदा काँग्रेसने नाराज आहे. काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. पण या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. यावरुन काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे पालिका: मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याने रुग्णांना PPE किट निम्या दरात
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी करोनाचे १ हजार ५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकुण संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात व्हेंटिलेटर अभावी निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने मृत्यू
पुण्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्था डळमळीत झाली आहे. याचाच फटका आज पुण्यातील एका शास्त्रज्ञाला बसला असून व्हेंटिलेटरअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (६१) असे त्यांचे नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ७ हजार ९७५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यातील करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. राज्यात आज ७ हजार ९७५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० इतकी झाली आहे. आज नवीन ३ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
CBSE बोर्डानं आज बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर २७ जुलैपासून नियमित सुनावणी - सर्वोच्च न्यायालय
अनेक महिन्यांपासून कोर्टात रखडलेल्या मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत 3 ते 4 वेळा अंतरिम निर्णयावर दिलासा देण्यात आला आहे, त्यात अजून किती बदल करायचा, अशी विचारणा कोर्टाने केली आहे. त्यामुळे 27 जुलैपासून दररोज सुनावणी घेण्याचा कोर्टाने निर्णय दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न राबवा ही सूचना आ. राजू पाटील यांनी १० एप्रिलला दिली होती, सरकारला जुलैमध्ये जाग
कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धारावीची दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेऊन शाबासकी दिल्यानंतर आता धारावीचा हा पॅटर्न कल्याण-डोंबिवली महापालिकाही राबवणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीच ही माहिती दिली आहे. धारावी पॅटर्नने हाताबाहेर गेलेला कोरोना महापालिका रोखणार आहे. त्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वसई-विरार महापालिका आयुक्तांवर अविनाश जाधव का संतापले? सविस्तर वृत्त
वसई विरार महापालिकेला तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले होते. धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली हप्ते. मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC