महत्वाच्या बातम्या
-
शिंदे महिनाभर गट विस्तारात | फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या दुःखात | ओबीसी आरक्षणावर नेटिझन्सकडून ठाकरेंचे आभार
ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगानुसार निवडणूक घ्या, दोन आठवड्यात कार्यक्रम जाहीर करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा दिलासा दिला आहे. दोन वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहेत याकडेही सुप्रीम कोर्टाने लक्ष वेधलंय.
3 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांना सामान्य जनतेचं समर्थन असं सांगत, लोकांची भूमिका सुद्धा शिंदेंनी स्वतःच जाहीर केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती दिली. “सर्व 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ लोकांचं पत्र दिलेलं आहे. दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. तर दुसरं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो होतो. हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी दिल्लीत आलो होतो. मी सर्व बारा खासदारांचं मनापासून स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
पीडितेने Video शेअर केला | बलात्काराचे आरोप झालेल्या खा. शेवाळेंना लोकसभेत शिवसेना पक्षाच्या नेतेपदी नेमण्याचा शिंदेंचा घाट
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यासंदर्भातले ट्विट्स या महिलेने पोस्ट केले आहेत. तसंच माझी तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीयेत त्यामुळे मला आता धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे न्याय मिळवून द्यावा असं म्हणत या पीडितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
कदमांचा राजकीय विनोद? | म्हणाले भुजबळ, राणे, राज ठाकरेंनी सेना सोडल्यावर मी शिवसेना वाचवली | पण फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा
रामदास कदम यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. तसं पत्रच त्यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली. मी स्वतःहून नेते पदाचा राजीनामा दिला आहे. माझी हकालपट्टी कशी काय करता? हे काय गणित आहे मला कळलं नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच शरद पवारांनी शिवसेनेला सुरूंग लावला असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तेल लावलेला पैलवान शिवसेनेचं भलं करणार आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सामान्य जनतेला मूर्ख बनवायला सामान्यांचं शिंदे सरकार आलं का? | पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त करून वीजबिलात 20% वाढ
महागाईने आधीच महिन्याचे बजेट कोलमडलेल्या सर्वसामान्यांना चहूबाजूंनी कोसळणाऱ्या महागाईची आणखी किती संकटे झेलावी लागणार, याची कल्पनाच करवत नाही. राज्यातील ‘महावितरण’च्या सुमारे पावणेतीन कोटी ग्राहकांना आणखी पाच महिने ही वाढ सोसावी लागेल, असे कंपन्यांनी सध्या म्हटले असले, तरी एकदा वाढलेले दर कमी होण्याच्या घटना दुर्मीळच असल्याने ती निमूटपणे सोसण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय नाही.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंची प्रतिशिवसेना | स्वतः झाले मुख्य नेते आणि मूळ शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
10th Schedule | बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार | आमदारकी, सत्ता आणि पक्ष सर्वच हातून जाणार? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत घटनेचे 10 वे शेड्यूल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत लोकसभेचे माजी सचिव पीडीटी आचार्य यांनी व्यक्त केले आहे. या दहाव्या शेड्युलच्या दुसऱ्या परिच्छेदानुसार जोपर्यंत पक्षातून फुटून बाहेर पडलेले आमदार यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नसेल, तोपर्यंत ते निवडून आलेल्या पक्षाचेच सदस्य राहतात. एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणात या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप त्यांना बंधनकारक ठरतो. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
हम करे सो कायदा? | राज्यात चाललंय काय? | घटनेतील कलम 164 (1A) दुर्लक्षित करत शिंदे-फडणवीसांची कॅबिनेट बैठक?
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
सरपंच जनतेतून आणि स्वतः बंडखोर आमदारांच्या समर्थनातून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेचा सर्व वेळ गट विस्तारात, जनता अधांतरी
महाविकास आघाडी सरकारनं रद्द केलेला सरपंच निवडीचा निर्णय पुन्हा लागू करण्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं केली आहे. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यापूर्वी जनतेनं निवडून दिलेले सदस्य सरपंच किंवा नगराध्यक्षांची निवड करत होते. पण, आता निर्णय बदलला जाणार आहे. हास्यास्पद म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे मात्र जनतेतून नव्हे तर चक्क बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. आजच्या घडीला लोकांना मुख्यमंत्री निवडून देण्याची संधी दिल्यास एकनाथ शिंदे शर्यतीत सुद्धा दिसणार नाहीत असं वास्तविक चित्रं आहे.
3 वर्षांपूर्वी -
CM Eknath Shinde | शिंदेंच्या गावात शालेय विद्यार्थ्यांना प्रवासाला धड रस्ता नाही, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड - हायकोर्टाकडून दखल
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या सातारा येथील शालेय मुलींना ये-जा करताना येणाऱ्या अडचणींची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. कोर्टाने गुरुवारी सुओ मोटू याचिकेवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांच्या गावावर भाष्य करताना शाळा नाही, रस्ता नाही पण दोन हेलिपॅड आहेत, असे सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार पाडण्यासाठी गुजरातमार्गे पळ काढला | आता गुजरातच्या फायद्याच्या बुलेट ट्रेनला शिंदे सरकारची मंजुरी
महाराष्ट्रातल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात पेट्रोल तसंच डिझेलच्या दरांवरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर ५ रूपये तर डिझेल प्रति लिटर ३ रूपये स्वस्त झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंचं बंड भाजपने का घडवलं? | ही आकडेवारी सर्व स्पष्ट करते | म्हणून भाजपने शिंदेंना राष्ट्रवादीविरोधात स्क्रिप्ट दिली
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठपका ठेवत शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतच पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल भूमिका मांडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदेंच्या बंडामागील पत्रकार दीपक शर्मा यांनी सांगितलेलं वास्तव जनतेने वाचू नये, तर लक्ष देऊन ऐकावं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
आनंदराव अडसूळ यांचा पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा | शिंदे गटात गेल्यास राणा दाम्पत्याची राजकीय अडचण होणार?
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा हा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. आनंदराव अडसूळ हे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंचं 'रिक्षाच्या आडून' स्वतःसाठी राजकीय मार्केटिंग | वास्तविक शिवसेनेच्या कृपेने आज 'आलिशान आयुष्य जगतात'
२१ जूनला शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत २९ आमदारांना घेऊन उठाव केला. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत न जाता आपण आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत गेलं पाहिजे ही या सगळ्यांची मुख्य मागणी होती. २१ जूननंतरच्या पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे आणखी १० तर अपक्ष १२ आमदार येऊन मिळाले. त्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आलं त्यानंतर पडलं.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक शक्य तितक्या लवकर भाजपात 'गट' म्हणून विलीन करणं हेच शिंदेंना लक्ष दिलंय?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारची आज खरी परीक्षा असणार आहे. कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झालेले असताना राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असून, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झटका दिलाय.
3 वर्षांपूर्वी -
सुरतमधून राज्य सरकार पाडलं | आता राज्य सरकारही परराज्यातून ऑपरेट होणार? | हा प्रकल्प वेगाने मार्गी लावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा फास्टट्रॅकवर येणार आहे. तसेच राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही उचलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Save Aarey Forest | आरे जंगल वाचवण्यासाठी तरुणांची पुन्हा आंदोलनाची तयारी | शिंदे सरकार विरोधात संताप वाढणार
महाराष्ट्रात पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आरे कॉलनीचं जंगल वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड न बांधण्याचा उद्धव सरकारचा निर्णय मागे घेतला, हे आपण जाणून घेऊया. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्ते संतापले असून, त्याविरोधात नव्याने लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे. १८०० एकरात पसरलेल्या या आरे फॉरेस्टला अनेकदा ‘मुंबईचं फुफ्फुस’ असं संबोधलं जातं. आरेच्या जंगलात बिबट्यांव्यतिरिक्त सुमारे 300 प्रजातीचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडलेले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rahul Narvekar | अध्यक्ष महोदय तुमचं अभिनंदन, पण किती दिवस पदावर राहाल माहित नाही- सुनील प्रभू
विधानसभेत शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या गुजरात, गोवा, गुवाहाटी, सागर बंगला ते राजभवनावर भेटी | स्व. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाकडे फिरकलेच नाही
विधानसभेत आज उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा पहिला सामना रंगतोय. कारण विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आज रंगते आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राजन साळवी यांना शिवसेनेचे उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून राजन साळवी ओळखले जातात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL