महत्वाच्या बातम्या
-
आगामी विधानसभा: डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी: अजित पवार
शिरूरचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे एनसीपी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारींना उत्तर देताना ते आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सध्या त्यांना मोठी जवाबदारी सोपविण्याचा गंभीर पणे विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
तो विद्यार्थी नाही तर शिवसैनिक; त्याला आदित्य यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दिसली
सध्याच्या कॉर्पोरेट पद्धतीच्या राजकारणात पेड आणि मॅनेज प्रकार असणार हे साहजिकच आलं. नरेंद्र मोदींच्या बाबतीत देखील अनेक इव्हेंट’मधील घटनांना वास्तवात घडल्यासारखे दाखवून होकारात्मक हवा निर्मिती केल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले. त्यात नरेंद्र मोदींच्या परदेशात संपन्न झालेल्या इव्हेंटमध्ये मोदींना प्रश्न विचारणारे अनेक लोक हे भाजपचे पदाधिकारी असल्याचं उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोदी-शाह राहणार उपस्थित
दोन महिन्यावर आलेल्या विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत. दरम्यान या यात्रेला भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार असल्याचे ऊत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात पक्ष सत्तेत असणं भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचं असल्याने केंद्रातील वरिष्ठ नेत्यांचे देखील निवडणुकीच्या रणनीतीवर बारीक लक्ष आणि मार्गदर्शन देखील होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपपेक्षा वंचितला पसंती; भाजपाची देखील डोकेदुखी वाढणार
भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
6 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचे ४१ लाख मतदारांना वाटत नाही: सुजात आंबेडकर
भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट प्रश्नी राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं.
6 वर्षांपूर्वी -
मनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे
शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हे सत्तेत की विरोधी पक्षात? त्यांचा सत्तेचा माज उतरवण्याची हिंमत शिवबंधनात: मंत्री तानाजी सावंत
सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचे प्रकार सध्या शिवसेनेत नवीन नसलं तरी त्यात अनेकांची भर पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यापैकी शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी मोर्चा, मग शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळात झोपा काढतात का? : आमदार बच्चू कडू
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले आणि मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: ‘जय श्री राम’वरून निष्पाप झोमॅटो डिलिव्हरी बॉयना बेदम मारहाण
सध्या देशात हिंदू मुलसमान दंगली घडतील अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे का असा संशय व्यक्त केला जातो आहे. देशभरात आणि विशेष करून हिंदी भाषिक राज्यांच्या पट्ट्यात या विषयाला अनुसरून परिस्थिती नाजूक झालेली असताना आता याचे लोन महाराष्ट्रात देखील हळूहळू पसरू लागले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या घटनांनी पुन्हा जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणतात ती मतं फक्त मोदींमुळे; तर चंद्रकांत पाटील म्हणतात बुथप्रमुख व पन्नाप्रमुखांमुळे
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांची माहिती आधार'ला जोडावी; मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र: मनसेकडून शंका
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येताच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला लेखी पत्र लिहून मतदारांची माहिती ‘आधार’ला जोडावी अशी विनंती केली आहे. मात्र यापूर्वी आधारचा डेटा चोरी झाल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यामुळे याच पत्राला अनुसरून मतदाराची महत्वाची माहिती किती सुरक्षित यावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेतेगिरी मिरवू नका पक्षाला काय दिले ते सांगा: जे. पी. नड्डा यांनी खडसावले
मी २५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करतो, २० वर्षे पक्षाचे काम करतो असे स्वत:ला मिरवण्यापेक्षा एवढ्या वर्षात तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि निकाल देणारं काम करा अशा कानपिचक्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत येथे दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे,माजी पक्षाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान
सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते मताधिक्य तुमच्यामुळे नाही, मोदींमुळे मिळाले; उमेदवारी मिळेलच या भ्रमात राहू नका: फडणवीस
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी ब्रँड निर्मितीचे 'तेच' कॉर्पोरेट मॉडेल आदित्य ठाकरेंवर राबवलं जातं आहे; अर्थात फलदायी ठरणार: सविस्तर
मोदी ब्रँड अर्थात होकारात्मक असो किंवा नकारात्मक पण आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे. मात्र ते गुजरात पुरता मर्यादित असलेलं राजकीय ब्रँड अचानक २०१४ पूर्वी पंतप्रधान पदाच्या चर्चेत कसं आणि एकदम देशावर राज्य कसं करू लागलं याचा अभ्यास केल्यास, ती एक शिस्तबद्ध आखली गेलेले योजनाच होती आणि आजच्या घडीला त्याला ‘राजकारणाचं कॉर्पोरेट मॉडेल’ म्हटलं तरी चालेलं. मात्र तत्पूर्वी भाजपने किंवा आरएसएस सारख्या संघटनांनी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नेमले आणि त्यांचे सल्ले स्वतः ऐकून ते प्रत्यक्ष अंमलात आणले असंच एकूण आहे. कारण आजच्या घडीला शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षात तज्ज्ञांच्या मतांची किंमत शून्यच असावी असंच म्हणावं लागेल. कारण इतर पक्षात तज्ज्ञ नेमून, त्यांच्या सल्ल्याने योजना अमलात आणण्यापेक्षा तंज्ञानाच ज्ञान देण्याचे प्रकार सुरु असावेत, मात्र आज शिवसेना त्याला अपवाद ठरली आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
खिदी-खिदी हसून पाठिंबा देतात की बेंच वाजवून? भारती पवार यांना पाठींबा देण्यासाठी थांबलेलो: रक्षा खडसे
भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेमधील हसण्याचा एक व्हिडिओ समजा माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावरून रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यांच्या एकूणच स्पष्टीकरणावरून त्यांची किंवा करावी असंच म्हणावं लागेल. देशाने आजपर्यंत संसदेत एवढ्या विषयाला किंवा मुद्दयाला पाठिंबा देताना समर्थन करणारे खासदार हे हाताने बेंच वाजवून समर्थन देतात हे पाहिलं आहे. मात्र संसदेतील बेंचखाली तोंड लपवून खिदी-खिदी हसून समर्थन देण्याचा जावईशोध खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रतिक्रयेतून लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
परळी'करांची तहान भागवण्यासाठी आता आल्यात ‘वॉटर व्हीलर’; धनंजय मुंडेंचा उपक्रम
सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी मराठवाड्यात अजून अनेक भागात हवा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी अजूनही अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्यासाठी अजून स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान परळीतील राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: नारायण राणे कुडाळ-मालवणमधून लढणार: आमदार नितेश राणे
राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्यात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याबाबत स्वतः आमदार नितेश राणे यांनीच भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON