महत्वाच्या बातम्या
-
रसायनीतल्या एचओसी कंपनीत प्रचंड वायुगळती, शेकडो माकडं आणि पक्षी मृत्युमुखी
रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून प्रचंड प्रमाणात वायुगळती झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सदर घडना घडल्याचे समजते. दरम्यान, या वायुगळतीमुळे शेकडो जनावरं आणि पक्षी मृत्युमुखी पडल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
आरबीआय गव्हर्नरपदी दास यांची नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात : उद्धव ठाकरे
आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंचा पाळलेला कुत्रा: नितेश राणे
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
कंत्राटी महाभरतीमुळे भाजप-शिवसेना बेरोजगारांना भविष्यात महा-बेरोजगारीकडे ढकलतील? सविस्तर
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकार आगामी निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटी महाभरतीचा खेळ करत आहे खरा, परंतु कंत्राटी नोकरी प्राप्त करणारे हेच उमेदवार भविष्यात बेरोजगार महाबेरोजगार ठरण्याची शक्यता अभ्यासाअंती समोर येते आहे. कारण विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त जागांपैकी ७० टक्के पदे बाहेरील यंत्रणेमार्फत आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस
निवडणूक प्रतिज्ञापत्रात २ खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सतीश ऊके यांनी न्यायालयात फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. तसेच सदर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
तो पराभव मोदींचाच! सामनातून उद्धव ठाकरेंची टीका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व जनतेने स्वीकारले : शरद पवार
५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
7 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांतील निकालाने भाजप-सेनेच्या मुंबई व आसपासच्या उत्तर-भारतीय राजकारणाला सुरुंग?
कालच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात तेलंगणात तिथला स्थानिक पक्ष टीआरएस’ने बाजी मारली, तर मिझोरामची सत्ता काँग्रेसने गमावली असली तरी तिथे सत्ता ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या स्थानिक पक्षाकडे गेली आहे. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यामध्ये भाजपच्या पुरता फज्जा उडाला असून भाजपचं या दोन राज्यांमधील अस्तित्व नगण्य झाले आहे. परंतु, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे निश्चित आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठवाडा: भाजप-शिवसेनेच्या राजवटीत ११ महिन्यात ८५५ शेतक-यांच्या आत्महत्या
सध्या दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या राजवटीत मराठवाड्यातील बळीराजाचे आत्महत्याचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे निदर्शनास येते आहे. कारण, पावसाच्या अभावामुळे घेतलेल्या पिकांचे होणारे नुकसान तसेच अंगावरील वाढता कर्जाचा बोजा, तसेच मोठ्या दुष्काळामुळे सततची नापाकी आणि त्यात प्रपंचाची चिंता, अशा दयनीय अवस्थेत अडकलेल्या बळीराजासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
नेटकऱ्यांचे प्रश्न: 'मतदारांनी खरे धाडस दाखवले', पण तुम्ही सत्तेला लाथ मारण्याचं धाडस कधी दाखवणार?
४ राज्यांमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत पर्याय कोण? याचा जराही विचार न करता जे नकोत त्यांना थेट नाकारले आहे. आणि त्यांना उखडून फेकले आहे. त्यामुळे असे धाडस दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाला सर्व राज्यांमध्ये अपयश आल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध होत असलेल्या निकालांनंतर भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ते म्हटले होते मोदी पंतप्रधान व्हावे 'ते' झाले, काल म्हणाले मोदींची उलटी गिनती सुरु होणार 'ती' झाली?
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा हीच मोदी सरकारची उलटी गिनती सुरु : राज ठाकरे
सध्या केंद्रातील मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. RBI गव्हर्नर उर्जित पटेलांचा राजीनामा यांचा राजीनामाहाच संदेश देऊन जातो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर-जळगाव-सांगली-मुंबई हाऊसिंग को-ऑपरेटिव्हच्या सलग पराभवानंतर नगर पालिकेत शिवसेना मोठा पक्ष
नगर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न भंग झालं आहे. दरम्यान, आजच्या निकालाअंती अहमदनगर महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी एकूण २४ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी द्वितीय क्रमांकावर असून त्यांनी एकूण १४ जागा जिंकल्या आहेत. असं असलं तरी धुळे महापालिकेवर एकहाती सत्ता खेचून आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते नगर मध्ये अपयशी ठरले आहेत. कारण भाजपच्या पदरात केवळ १४ जागा [पडल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी, मतदाराच्या या वृत्तीमुळेच राजकारणी उन्मत्त होतात?
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमवर सर्वबाजूने टीका झाली होती. परंतु, असं असताना अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम तडीपार असताना सुद्धा वॉर्ड क्रमांक ९ मधून तब्बल २००० पेक्षा अधिक मताधिक्याने आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
धुळे: भाजपला ५० जागांसह स्पष्ट बहुमत मिळणार, तर अनिल गोटे तोंडघशी
महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर सत्तास्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत असून त्यांनी एकहाती सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. धुळ्यात भारतीय जनता पक्षाचे जवळपास ५० हून अधिक उमेदवार आघाडीवर होते.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बोलावतात आणि अपमान करतात - नितीन गडकरी
माजी खासदार आणि किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत असतानाचा एक असाच काहीसा अनुभव सांगितला. मोदी सरकारकडून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला आणि त्यानंतर या निर्णयावर मत मांडण्यासाठी मोदींनी सर्वाना सांगितले. नाना पटोलेंनी मोदींच्या या निर्णयाला विरोध केला, हा विरोधाचा सूर ऐकताच मोदी पटोलेंवर संतापले आणि त्यांना प्रश्न केला ‘तुम्ही मला शिकवणार का?’.
7 वर्षांपूर्वी -
पक्षाध्यक्षांचे फेसबुकवर विडंबन, शिवसैनिक आक्रमक, नेटकऱ्यांनी 'त्या' विडंबनची आठवण करून देत झापलं
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर केलेले विडंबन कळंबोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तशीही समाज माध्यमांवर वरचेवर जवळपास सर्वच नेत्यांची विडंबन असणारी चित्रं रोजच्या रोज दिसत असतात. तसेच काहीसे एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने केवळ ते फेसबुकवर शेअर केले. परिणामी सकाळी ११:३० वाजता व्हायरल केलेली ती पोस्ट शिवसैनिकांच्या चांगलीच वर्मी लागली. परिणामी रात्री ७ च्या नंतर तरुणाच्या घरापर्यंत शिवसैनिक मोठ्या संख्येने पोहोचले.
7 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ, राज्यपालांनी सावरले
राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ आल्याचे समजते. परंतु, बाजूला उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले. दरम्यान, गडकरी यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH