3 May 2025 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

ती मुलाखत बघून शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून डोकी भिंतीवर आपटली असतील

Shivsena, Saamana Newspaper, Tarun Bharat Newspaper

मुंबई, २८ जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली. ‘चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहे. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीची ‘तरुण भारत’ (नागपूर) या वृत्तपत्रातून खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘उद्धव यांची ही मुलाखत खदखदून हसवणारी होती. या मुलाखतीच्या आडून भावाला मंत्रिपद न मिळाल्याचा सूडच संजय राऊत यांनी उद्धव यांच्यावर उगवला,’ अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.

नागपूर येथून प्रकाशित होणारे ‘तरुण भारत’ हे दैनिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक नाते सांगणारे आहे. आठ महिन्यांपूर्वी भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा आल्यानंतर ‘तरुण भारत’नं सातत्यानं भाजपची भूमिका मांडण्याचं काम केलं होतं. एरवीही ‘तरुण भारत’मधून भाजपवरील टीकेला उत्तर दिलं जातं. या वृत्तपत्राचे सहयोगी संपादक श्रीनिवास वैद्य यांनी आजच्या लेखातून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाष्य केलं आहे. ‘खळबळजनक अशी जाहिरात केलेली ही मुलाखत प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांची टिंगलटवाळी करणारी ठरली. आरशासमोर बसून मुख्यमंत्री आपलं प्रतिबिंब पाहताहेत असं वाटत होतं. ही मुलाखत पाहून अस्सल शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून आपली डोकी भिंतीवर आपटून घेतली असतील,’ असा जोरदार टोलाही लगावण्यात आला आहे.

मुलाखतीत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हचं कौतुक केलं होतं. ‘राज्याचे मुख्यमंत्री जागतिक आरोग्य संघटनेला मार्गदर्शन करताहेत असं फेसबुक लाइव्ह पाहताना वाटत होतं. हे ज्ञान तुम्ही कुठून मिळवलं’, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. हा प्रश्न विचारून संजय राऊत यांनी ठरवून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणले, असा आरोप लेखातून करण्यात आला आहे.

 

News English Summary: ‘Tarun Bharat’ answers the criticism of BJP. Srinivas Vaidya, Associate Editor of this newspaper, has commented on Uddhav Thackeray’s interview in today’s article. ‘This sensationally advertised interview actually turned out to be Uddhav Thackeray’s tingling.

News English Title: Tarun Bharat answers to CM Uddhav Thackeray interview given to Saamana Newspaper News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या