
Apollo Micro Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर 14 टक्क्यांच्या वाढीसह 105.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
मागील 5 दिवसात अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी बिझनेस अपडेटमुळे पाहायला मिळाली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 105.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 20.71 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स स्टॉक 1.42 टक्के घसरणीसह 96.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अपोलो मायक्रो सिस्टीम्स या एरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीशी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने एमपी-3 इंटरनॅशनल कंपनीला मध्य पूर्व आशिया देशातील बाजारपेठेसाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. MP-3 इंटरनॅशनल ही कंपनी ग्रेड वन ग्रुपचा भाग आहे. याशिवाय अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने 50 दशलक्ष रुपये गुंतवणुक करून नवीन कंपोझिट उत्पादन कारखाना स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
मागील 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 830 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 डिसेंबर 2021 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स स्टॉक 11.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 105.40 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
मागील 5 दिवसात अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स स्टॉक 67.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यांत अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.