
Tenant New Law | आपले घर आपण फार कष्टाने उभे करत असतो. जर आपले घर आपण कुणाला भाड्याने राहण्यास दिले आणि त्या व्यक्तीने घरावर ताबा मिळवला तर यात आपली मोठी फसवणूक होते. अनेक व्यक्ती आपले हक्काचे घर असावे म्हणून कर्ज काढून ते खरेदी करतात. काही वर्षांनी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे आपले घर भाड्याने देऊन अनेक जण नोकरीच्याच ठिकाणी वास्तव करतात.
घराच्या येणा-या भाड्यामुळे आर्थिक मदत होते. अशात काही व्यक्ती भाडेकरू चांगले आहेत असे म्हणून अनेक वर्षे त्यांना आपले घर भाड्याने देतात. मात्र काही व्यक्ती आपला विश्वसघात करतात आणि खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने घरावर ताबा मिळवतात. हे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे जेव्हा असे खटले न्यायालयात चालतात तेव्हा तारखांपलीकडे काहीच मिळत नाही.
सेवा निवृत्तीनंतर आपण आपल्या कुटूंबाबरोबर हक्काच्या घरात राहू असे अनेकांना वाटते. मात्र यात भाडेकरार आणि इतर कायदेशीर बाबी निट न पाळल्यास तुमच्याही संपत्तीवर दुसरे कोणी आपले नाव लावू शकते. भारतात असे प्रकार फार वाढत चालले आहेत. त्यामुळे भाडेकरू आणि घर मालक यांसाठी कायद्यात अनेक नियम आहेत.
असे झाल्यास काय करावे
केंद्र सरकारने २०२१ मध्ये मॉडेल टेन्ससी कायदा लागू केला आहे. यात भाडेकरू आणि घर मालक या दोघांमध्ये होणा-या या वादाचा तोडगा आहे. केंद्र सरकारने सुरू केलेला हा कायदा मात्र अद्याप कागदावर आहे. अजूनही याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. राज्य शासनाला हवे तसे बदल करूण याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. दोन्ही गटातील व्यक्तींचे वाद सोडवण्यास या कायद्यात अनेक तरतुदी आहेत. याचा घरमालक आणि भाडेकरू दोघांना देखील फायदा आहे.
असा लागू होईल नविन कायदा
यात सर्वात आधी सर्व भाडेकरूंचे लेखी करार होतील. त्यासाठी प्रत्येक जिल्हयात भाडेप्राधीकरण केंद्र उभारले जाईल. यात तुम्हाला तुमचा करारनामा सादक करावा लागेल. या केंद्रात नोंदणी झाल्यावर यूनिक आईडेंटिफिकेशन नंबर तुम्हाला दिला जाईल. यात घराची सर्व जबाबदारी वाटून देण्यात येणार आहे. रंगाचे काम घर मालक तर किरकोळ दुरूस्ती भाडेकरू करणार असा नियम आहे. हे नियम जुन्या आणि नविन सर्वच भाडेकरूंना आहेत. भाडेकरू आणि घर मालक यांच्यात कोणताही वाद झाल्यास या कायद्याअंतर्गत ६० दिवसांच्या आत यावर निर्णय घेतला जाईल.
या कायद्याचा जास्त फायदा घर मालकाला होणार आहे. जर घरमालकाने करार करुन नंतर भाडेकरू करारा संपल्याच्या सहा महिन्यांनी घर खाली करत नसेल तर त्याला दंड भरावा लागेल. हा दंड एका महिन्याच्या भाड्याच्या रकमेच्या दुप्पट असेल. तर घर खाली न केल्यास रक्कम चौपटीने वाढेल. तसेच भाडेकरूला डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकले जाईल.
भाडेकरूला असा होईल फायदा
जर घरमालकाला कराराच्या तारखेआधीच भाडेकरूला बाहेर काढायचे असेल तर त्याला यासाठी प्राधिकरणाची परवाणगी घ्यावीच लागेल. तसे न करता भाडेकरूला बाहेर काढता येणार नाही. तसेच भाडेकरूला योग्य वेळ द्यावा लागेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास भाडेकरू घरमालकावर तक्रार दाखल करू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.