3 May 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Numerology Horoscope | 24 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नवीन कामे सुरू होऊ शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील. जुन्या मित्रांना भेटता येईल.

मूलांक 2-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्चाचा अनुशेष होईल. आपल्याला कर्ज देखील घ्यावे लागू शकते. मनात चिंता राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. परिवाराचे सहकार्य मिळेल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 3-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नशीब साथ देईल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. खर्चाचा अतिरेक होईल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता.

मूलांक 4-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. प्रत्येक कामात सावधानता बाळगा. क्षेत्र आणि व्यवसायात सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या कामांमधील निर्णय सध्यातरी पुढे ढकला. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 5-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कार्यक्षेत्रात विरोधक सक्रिय राहू शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक ६-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. जुन्या मित्रांची भेट संभवते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक ७-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 8-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. जोखमीच्या बाबतीत सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ९-
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. पूर्वकल्पित कामे पूर्ण होतील. क्षेत्रात व व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 24 October 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x