 
						Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्जबाजारी टेलिकॉम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. व्होडाफोन गृप इंडस टॉवर कंपनीमधील भाग भांडवल विकून आपले कर्ज परतफेड करणार आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 17.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.54 टक्के घसरणीसह 16.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
भारतातील अनेक दूरसंचार कंपन्या आपल्या मोबाइल सेवांचे दर वाढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे टेलिकॉम स्टॉकमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील टेलिकॉम कंपन्या आपल्या मोबाइल सेवा शुल्कात 15-17 टक्के वाढ करू शकतात. 4G सेवांच्या तुलनेत 5G सेवेचे शुल्क 5-10 टक्के वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन ग्रुपने ब्लॉकडील अंतर्गत इंडस टॉवर कंपनीमधील आपला काही हिस्सा विकला आहे. 2022 पासून व्होडाफोन आयडिया कंपनीला होणाऱ्या नुकसानीमुळे व्होडाफोन गृपने इंडस टॉवर कंपनीचे शेअर्स विकून कर्ज परतफेड करण्याचा निर्णय घेतला.
व्होडाफोन ग्रुपने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, ते यापुढे भारतात कोणतीही नवीन गुंतवणूक करणार नाही. व्होडाफोन ग्रुपने इंडस टॉवर कंपनीमध्ये 28 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		