3 May 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

भाजपाच्या विचारधारेशी असहमत असणारे लोक देशविरोधी नाहीत: आडवाणी

Lalkrushna Advani, Narendra Modi, BJP, RSS

नवी दिल्ली : आमच्या विचारांशी असहमत असलेले कोणीही असोत पण ते देशविरोधी नाहीत असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटले आहे. जे आमच्या म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी सहमत नसलेले लोक देशविरोधी नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्याद्वारे त्यांनी स्वतःची सविस्तर भूमिका मांडली आहे.

६ एप्रिलला भाजपाच्या स्थापना दिवस आहे त्याच निमित्ताने लालकृष्ण आडवाणी यांनी एक ब्लॉग लिहिला आहे आणि त्यात त्यांनी त्यांच्या मनातल्या सर्व खदखद व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नागरिकाला त्याचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. हे स्वातंत्र्य सार्वजनिक आयुष्याबाबत असो किंवा व्यक्तिगत स्तरावर किंवा अगदी राजकिय स्तरावर असले तरी देखील ते आम्ही दिले आहे. आपल्या ब्लॉगमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी गांधीनगर येथील मतदारांचेही खूप आभार मानले आहेत. १९९२ नंतर येथील मतदारांनी मला तब्बल ६ वेळी निवडून दिले त्यामुळे मी त्यांचा देखील अत्यंत आभारी आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

देशसेवा करणं हे माझ्या रक्तात आहे, त्याकडे मी एक दीर्घ मोहिम म्हणून पाहतो. मी वयाच्या १४ व्या वर्षी आरएसएस मध्ये प्रवेश केला. मागील ७ दशकात माझे आयुष्य भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आहे. आधी भारतीय जनसंघ, त्यानंतर भाजपाचा संस्थापक सदस्य या आणि अशा अनेक जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या आहेत. पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर यांच्यासोबत मला काम करता आलं हे मी माझे खूप मोठं भाग्य समजतो. निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत, त्या योग्य पद्धतीने आणि निष्पक्षपातीपणाने झाल्या पाहिजेत असेही मत लालकृष्ण आडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x