30 April 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

फेक TRP | वाद दोन वृत्तवाहिन्यांमधील | भाजपाची प्रवक्तेगिरी अर्नब गोस्वामीसाठी

BJP leader, India Today, Republic TV, Fake TRP in FIR

मुंबई, ९ ऑक्टोबर : अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर समोर आलेल्या एफआयआरमध्ये मात्र रिपब्लिक या वाहिनीऐवजी इंडिया टुडेचं नाव असल्याचं दिसलं होतं. त्यानंतर या घोटाळ्यात या दोन्ही वाहिन्यांपैकी कोणाचं नाव आहे असा सवाल विचारला जात होता. दरम्यान, यावर मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “एफआयआरमध्ये इंडिया टुडेचं नाव होतं. परंतु आरोपी किंवा कोणत्याही साक्षीदारानं याची पुष्टी केली नाही,” असं भारांबे म्हणाले.

“एफआयआरमध्ये इंडिया टुडेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु कोणत्याही आरोपीनं अथवा साक्षीदारानं याची पुष्टी केली नाही. याव्यतिरिक्त आरोपींनी विशेषत: रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांची नावं घेतली. या प्रकरणी तपास सुरू आहे,” असं भारांबे म्हणाले.

तर दुसरीकडे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी रिपब्लिक टीव्हीचं नाव घेतल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. “सुशांतसिंह राजपूतप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या संशयास्पद तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्याने पोलीस आयुक्त परमबीर सिंग रिपब्लिक वाहिनीविरोधात बिनबुडाचे आरोप करत आहेत. बीएआरसीने एकाही तक्रारीत रिपब्लिक वाहिनीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आयुक्त सिंग यांचेच पितळ उघडे पडले. या कृतीबद्दल रिपब्लिक टीव्ही वाहिनी सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेल.” असं अर्णब गोस्वामी म्हणाले.

आता, भाजपा नेते कपिल मिश्रा यांनीही FIR मध्ये रिपल्बिक टीव्हीचे नाव नसून इंडिया टुडेचं नाव असल्याचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. तसेच, मिश्रा यांनी FIR चे पेजेसही ट्विटरवरुन शेअर केले आहेत. त्यामध्ये, इंडिया टुडे या वृत्तवाहिनीचे नाव दिसत आहे. त्यास, अंडरलाईन करुन दर्शविण्यात आले आहे.

 

News English Summary: Broadcast Audience Research Council (BARC), the body that gives rating points to TV channels in India, had earlier suspected Republic TV and India Today of manipulating the system. Hansa Research, the company that installed these rating boxes called barometers on behalf of BARC, had filed a case with the Mumbai Police saying some of Hansa Research’s former employees had leaked or sold the data of the households where these barometers were installed. The data about these households are closely guarded and supposed to be top secret.

News English Title: BJP leader shares India Today not Republic in FIR photo about fake TRP case Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या