2 May 2025 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

बोलबच्चन! २०१० ला मेट्रो'ने माझ्या 'प्रायव्हसी'वर आक्रमण; मग त्या २१९ प्रजातींची प्रायव्हसी? - सविस्तर

SaveAarey, Save Aarey, Amitabh Bachchan, Mumbai Metro, Mumbai Metro 3, Metro Car Shade

मुंबई: सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याबाबत बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती सूचना मागिवल्या होत्या, त्यावर ‘झटका डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या ८० हजार तक्रारींबाबत अश्विनी भिडे यांनी शंका व्यक्त केली. कार शेड तिथून हटवा, झाडे तोडू नका, अशा एकाच प्रकारच्या तक्रारी होत्या. खऱ्या तक्रारी असतील तर त्याबाबत काही आक्षेप नाही, परंतु संख्या वाढवून दाखविणे, हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करणारी माणसे आहेत का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तरीही मेट्रो कारशेडसाठी आरेची जागा का निवडली, झाडे तोडली तर भरपाई म्हणून आम्ही काय करणार आहोत, याबाबत त्या सर्व ८० हजार तक्रारींना उत्तरे दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान काल सकाळी अकराच्या सुमारास अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करत अनुभव सांगितला. त्यात त्यांनी म्हटलं, ‘माझ्या एका मित्राने मेडिकल इमर्जन्सीमुळे स्वतःच्या कारने प्रवास करण्यापेक्षा मेट्रोने प्रवास करणं पसंत केलं, परत आल्यावर तो मेट्रोच्या वेगवान, सुलभ आणि कार्यक्षमतेमुळे प्रभावित झाला, हे प्रदूषणावर उपाय..झाडे लावा…मी माझ्या बागेत केलं आहे….तुम्ही’. विशेष म्हणजे अब्जाधीश अमिताभ बच्चन यांचे मित्र देखील सार्वजनिक प्रवासाची साधनं वापरतात हे देशाला काल समजलं. इतकंच नाही तर मेडिकल इमेजन्सीमध्ये असलेल्या मित्राने सर्व इमर्जन्सी विसरत त्या अवस्थेत देखील अमिताभ बच्चन यांना मेट्रोचे प्रचंड फायदे सांगण्यासाठी संपर्क साधला, जेणेकरून ते मुंबईकरांसोबत तो अद्भुत अनुभव शेअर करू शकतील.

मात्र अमिताभ बच्चन हे किती स्वार्थी आणि दुप्पटी स्वभावाचे आहेत याचा पुरावाच आम्ही देत आहोत. २०१० मध्ये याच मुंबई मेट्रोवर आगपाखड करणारे बच्चन आज २०१९ मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कोणाच्यातरी सांगण्यावरून सर्वकाही करत आहेत असं अनेकांनी वाटू लागलं आहे. म्हणजे २०१० मध्ये मुंबई मेट्रो प्रतीक्षा बंगल्यावरून जाणार असं समजताच त्यांनी भला मोठा ब्लॉग लिहून संताप व्यक्त करताना म्हटलं होतं, ‘परंतु इथे मारेकरी आहेत! ते प्रतिक्षावरून बंगल्यावरून जाणार! टाटा प्रायव्हसी आणि नमस्कार सहकारी प्रवासी…असं त्यांनी ब्लॉगमध्ये खोचकपणे म्हटलं होतं.

२८ ऑगस्ट २०१० साली त्यांनी संताप व्यक्त करणारा ब्लॉग लिहून भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. तो संपूर्ण ब्लॉग तुम्ही येथे वाचू शकता…अमिताभ बच्चन यांचा तो ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

त्यावेळी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी संताप व्यक्त करत मुंबईतील ‘प्रीतीक्षा’ या त्यांच्या घरावरून जाणाऱ्या मेट्रो ट्रेनमुळे आमची प्रायव्हसी संपुष्टात येणार आहे असं म्हणत प्रवाशांना (मुंबईकर) देखील ब्लॉगमध्ये टोला हाणला होता. मात्र स्वतःच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीवर बोलणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी स्वतःचे प्रश्न नव्या सरकारने सोडवताच याच मेट्रोच्या आरेतील कारशेड’मुळे जंगलातील २१९ दुर्मिळ प्राणांच्या प्रजातींचा प्रायव्हसीवर कानाडोळा करत, सरकार आणि प्रशासनाच्या मागील आठवड्यापासून नियोजनबद्ध सुरु असलेल्या अभियानामध्ये सहभाग घेतल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे अमिताभ हे निसर्ग आणि मुंबईच्या बाबतीत केवळ स्वार्थी आणि बोलबच्चन असल्याचं उघड होतं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या