3 May 2025 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

म्हणजे मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला PoK म्हटलं याच्याशी विरोधी पक्ष सहमत आहेत? - राऊत

Kangana Ranaut, Mumbai High Court, MP Sanjay Raut, PoK

मुंबई, २७ नोव्हेंबर : बॉलीवूड अभिनेत्रीनं मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पीओके (Kangana Ranaut was called Mumbai Police Mafia and Mumbai city PoK) म्हटलं होतं. कोर्टाच्या आदेशामुळे उत्साहीत झालेल्या विरोधी पक्ष यास सहमत आहे काय? न्यायाधीश किंवा न्यायालयांविषयी असभ्य वक्तव्यांमुळे अवमान होतो. मग कोणी महाराष्ट्रासह मुंबईबद्दल असं भाष्य करते, तेव्हा ती मानहानी नाही का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतचा बंगला आणि कार्यालयावर मुंबई महापालिकनं केलेली कारवाई बेकायदा असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court Decision over BMC action on Kangana Ranaut office) दिला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाचा बंगला आणि कार्यालयावर चालवलेला हातोडा अवैध असल्याचा म्हणत मुंबई हायकोर्टानं ताशेरे ओढलेत्यावर संजय राऊत यांनी ANIशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

“अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांना माफिया म्हटलं आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. कंगनाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर उत्साही झालेल्या भाजपाला हे मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?” असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

News English Summary: The actress called Mumbai Police mafia and Mumbai PoK. Do parties which are excited over Court order agree with this? Indecent remarks about judges or Courts lead to contempt, is it not defamation when someone makes such remarks about Maharashtra/Mumbai? said Shivsena MP Sanjay Raut.

News English Title: Kangana Ranaut called Mumbai PoK do parties which are excited over high court order agree with this ask MP Sanjay Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या