नवी दिल्ली: जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहेत. त्या कॅम्पसमधील आंदोलनात अनेक सिलीब्रीटी व्यक्ती देखील सामील होतं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत.

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात ३४ विद्यार्थी जखमी झाले असून, विद्यार्थी संघटनेची आईशी घोष ही जखमी झाली आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला आहे. कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू असताना कन्हैय्या जय भीम जय भीमच्या घोषणा देत होता. त्याचवेळी दीपिका आंदोलनस्थळी दाखल झाली. दीपिकानं केवळ आईशीसोबत काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर ती निघून गेली. यावेळी तिनं मीडियाशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही.

दरम्यान, मराठी कलाकारांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील या घटनेचा निषेध करत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सोनाली कुलकर्णीने ट्विटवर संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘आपण आपल्याच देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि आपण इतर देशातील अल्पसंख्याकांना सुरक्षा द्यायला निघालो आहोत’ असं ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

 

Web Title:  Marathi Actress Sonalee Kulkarni Slams Government over JNU attack on students.

आपण इथल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि आपण…पुढे काय म्हणाली सोनाली?