21 May 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

आशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात कोणते संबंध आहेत? | मलिकांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅट शेअर केले

Nawab Malik Vs Sameer Wankhede

मुंबई, १६ नोव्हेंबर | कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप चॅट काही स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. आज (16 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट सार्वजनिक (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करत खळबळ उडवून दिली.

Nawab Malik Vs Sameer Wankhede. Kiran Gosavi, an NCB witness in the drug party case screenshots of the WhatsApp chat in which Khabari and Gosavi are seen talking to each other about the identity of the person :

ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार आणि सध्या येरवडा तुरुंगात असलेल्या किरण गोसावी आणि खबऱ्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट ट्वीट केले आहेत. ज्यात खबरी आणि गोसावी एकमेकांशी व्यक्तींच्या ओळखीबद्दल बोलताना दिसत आहे.

‘किरण गोसावी आणि खबरी यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून दिसून येतंय की, कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीत सहभागी होणाऱ्या लोकांना जाळ्यात अडकवण्याची योजना ते कशा पद्धतीने आखत होते. ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी आर्मी आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे’, असंही मलिकांनी हे स्क्रीनशॉट ट्वीट करताना म्हटलं आहे.

याचबरोबरच नवाब मलिक यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे, जे काशिफ खान संदर्भातील आहे. ‘किरण गोसावी आणि खबरी यांच्यातील हे चॅट आहे, ज्यात काशिफ खानचा उल्लेख केलेला आहे. मग काशिफ खानची चौकशी का केली जात नाहीये? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यामध्ये कोणते संबंध आहेत?’, असा सवालही मलिक यांनी विचारला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nawab Malik Vs Sameer Wankhede screenshots of WhatsApp chat between NCB Khabari and Gosavi.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x