महत्वाच्या बातम्या
-
MP Sanjay Raut on Congress Crisis | काँग्रेसला अध्यक्ष नसणं चांगली गोष्ट नाही, भाजप फायदा घेतंय - राऊत
कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो. काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचं सहकार्य आहे. असं असताना गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात असं संजय राऊत म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Navratri Garba | मुंबई वगळता राज्यात गरब्याला परवानगी | कोरोना नियमांच्या अटी लागू
मुंबई महापालिका क्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा (Navratri Garba) खेळण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यासाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Defamation Suit Against Kirit Somaiya | मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना कोर्टाकडून समन्स
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Suit Against Kirit Somaiya) दाखल केलाय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखविणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांना सोमैय्या माफिया म्हणाले
मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा आपल्या देशासाठी एक वाईट आठवण आहे. पण याच हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड याचे मोल ठरवणेही शक्य नाही. दहशतवाद्यांनी हल्ला करून जेव्हा काही दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले तेव्हा त्याठिकाणी अनेक लोक होते. त्या सर्वांचे प्राण धोक्यात होते. त्यांना वाचवण्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे कशाचीही पर्वा न करता केवळ एका बॉडीगार्डसह ताजमध्ये घुसले.
4 वर्षांपूर्वी -
MP Bhavana Gawali | भावना गवळी वर्षावरून मुख्यमंत्र्यांची भेट न होताच परतावे लागले
ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी म्हणून भावना गवळी (MP Bhavana Gawali) मुंबईला वर्षावर गेल्या. त्यांना एक तास प्रतिक्षा करावी लागली पण अखेर मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. या भेटीविनाच त्यांनामाघारी परतावे लागले असे समजते
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing? | परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर पत्रकार परिषदा अन फरार होण्यावर फडणवीसांची धावती प्रतिक्रिया
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंह यांना देशाबाहेर (Parambir Singh Missing) जाण्यासाठी केंद्रानं मदत केल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडल्यानंतर त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sharad Shatnam Health Scheme | शरद शतम: योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य चाचणी - धनंजय मुंडे
शरद पवार यांच्या नावानं राज्यातील वृद्धांसाठी आरोग्य योजना प्रस्तावित आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, अशी घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार बळावतात. त्यासाठी त्यांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज असते. या सगळ्यांसाठी हजारो रुपयांची आवश्यकता असते. मात्र अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणं त्यांना शक्य होत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing? | परमबीर सिंग भारत सोडून पळाले असतील तर त्यात निश्चितच भाजपची भूमिका असणार - काँग्रेस
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Coastal Road Project | मुंबईतील सागरी प्रकल्पाच्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्राची मंजुरी
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (सीझेडएमपी) आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. याचा फायदा मुंबईतील प्रलंबित सागरी प्रकल्पांना होणार आहे. आता बांधकामाची मर्यादा ५०० मीटरवरून थेट ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
खोटे आरोप करून पळ काढला? | परमबीर सिंग चंदीदडहून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Press Release | भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही दबाव आल्यास गंभीर दखल घेतली जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Press Release) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत किंवा निर्णय न घेण्याबाबत प्रयत्न करण्याची कृती दबाव समजून अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Metro Train | मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी करताना आरेतील एकही झाड तोडायचं नाही - मुख्यमंत्री
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वे (Mumbai Metro Train) डब्यांची चाचणी मरोळ मरोशी येथे केली जाणार आहे. ही चाचणी करताना आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Mahagenco Recruitment 2021 | महानिर्मिती मुंबईमध्ये ३८ पदांची नवीन भरती
महाजेन्को भरती 2021. महाजेनको भारती (Mahagenco Recruitment 2021). महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 38 अभियंता आणि केमिस्ट पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी महाजेन्को भरतीला योग्य माध्यमाद्वारे अर्ज सादर करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
BMC Road Potholes | ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का? - संदीप देशपांडे
राज्यभरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन आता राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचं दिसतंय. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्ड्यांच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत आपली भूमिका मांडली आहे. अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी (BMC Road Potholes) राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग बेपत्ता की आरोप करून देश सोडायला सांगितले? | युरोपातील देशात पळाल्याचा संशय
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) सापडत नाहीत. त्यामुळे ते गायब झालेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ते युरोपातील देशात पळून गेले असतील, असा संशयही तपास यंत्रणांकडून लावला जात आहे. कारण, चांदीवाल कमिशनने जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी सिंग यांना शोधण्याचा प्रयत्न केला.
4 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray | पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा | राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
एकाच दिवशी दोन परीक्षा? | पण आरोग्य विभाग आणि TET दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार झालाय का?
आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने मोठा गदारोळ झाला. अखेर आरोग्य विभागाकडून गट ‘क’ साठी २४ तर गट ‘ड’ साठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण (Health Department exam and TET exam) निर्माण झाले आहे. परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालकांशी आपण बोलून मार्ग काढणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका | तातडीच्या मदतीचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी (Heavy rain in Marathwada) आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.
4 वर्षांपूर्वी -
MH-CET Entrance Exam | काळजी नको, अतिवृष्टीमुळे CET परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी - राज्य सरकार
राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
Sakinaka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 346 पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रात 77 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात दाखल केले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL