12 December 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Mutual Fund SIP | तुम्हालाही परवडेल हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय | झेडफंड्स मध्ये 100 रुपयांपासून SIP स्कीम

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | आजकाल गुंतवणुकीसाठी एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकप्रिय पर्याय ठरत आहे. ‘एसआयपी’अंतर्गत तुम्ही पूर्वनिर्धारित म्युच्युअल फंड योजनेत ठराविक रक्कम एका अंतराने गुंतवता. म्युच्युअल फंड वितरण प्लॅटफॉर्म झेडफंड्सने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आणली आहे.

दररोज १०० रुपयांची एसआयपीची योजना :
झेडफंड्सने मंगळवारी म्युच्युअल फंड योजना सुरू केली असून, त्यात दररोज १०० रुपयांची एसआयपी आहे. ग्रामीण भाग आणि छोटी शहरे लक्षात घेऊन आणले आहे. यासंदर्भात झेडफंड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि टाटा म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही एसआयपी योजना सुरू करण्यात आली आहे.

झेडफंड्स इतर म्युच्युअल फंड कंपन्यांच्या संपर्कात :
याशिवाय कंपनी इतर अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांशीही संपर्क साधून आपल्या उत्पादनाची पोहोच वाढवत आहे. या फंड योजनेच्या माध्यमातून टियर-२, टियर-३ आणि टियर-४ शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा झेडफंड्सचा मानस आहे. लहान शहरे आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांमध्ये दररोज कमाईचे प्रमाण जास्त असल्याने ही योजना अधिक प्रभावी ठरू शकते.

छोटे गुंतवणूकदारही गुंतवणूक करू शकतील:
या योजनेमुळे दैनंदिन कामगार आणि छोट्या उद्योगांनाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ मनीष कोठारी म्हणाले, ‘म्युच्युअल फंड उत्पादने भारतातील लोकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी ही पूर्णपणे नवीन संकल्पना आहे. यामुळे स्वयंरोजगार करणाऱ्या आणि दररोज पैसे घेणाऱ्यांसाठी गुंतवणुकीचा पर्यायही निर्माण होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mutual Fund SIP in ZFund check investment details here 04 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x