14 December 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

पंकजा व खडसेंवर थेट संघाकडून बोचरी टीका; भाजपातील मार्ग खडतर? सविस्तर वृत्त

BJP Leader Pankaja Munde, Eknath Khadse

नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंना शाब्दिक खडेबोल सुनावले असताना आता संघाशी संबंधित वृत्तपत्र तरुण भारत दैनिकाने पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजपातून पंकजा मुंडे यांना बाहेरचा रास्ता दाखविण्यासाठी भाजपतील गल्ली ते दिल्लीतील नेते मंडळी पुढे सरसावली होती आणि त्यात थेट राष्ट्रीय स्वयंसेवक पक्षाने देखील भर घातल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर झाल्याची चर्चा रंगली आहे.

अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का, स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही. गुरुवारी, परळीजवळील गोपीनाथ गडावर, गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, पंकजा मुंडे आणि एकनाथ ऊर्फ नाथाभाऊ खडसे यांनी जे मनोगत व्यक्त केले, त्यात या दोघांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचे अजिबात जाणवले नाही अशा शब्दात संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत दैनिकाने खडेबोल सुनावले आहेत.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते राजकीयदृष्ट्या अयोग्य असेच होते.

मुळातच गोपीनाथ मुंडे काय किंवा चंद्रकांतदादा पाटील काय, ही मंडळी चळवळीतून समोर आली आहेत आणि जी मंडळी अशी चळवळीतून, संघर्षातून पुढे आलेली असतात, त्यांना पक्षही बरेच काही देण्यास उत्सुक असतो. पंकजा मुंडेंच्या बाबतीत मात्र, त्या चळवळीतून किंवा संघर्षातून पुढे आल्यात, असा काही इतिहास नाही. वडिलांची पुण्याईच इतकी प्रचंड होती की, त्याचा त्यांना अनायास लाभ मिळाला. परंतु, पुण्य नेहमीच झपाट्याने कमी होत असते.

तत्पूर्वी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर खडसे आणि पंकजा मुंडे यांची खदखद समोर आली होती. परंतु या जाहीर मेळाव्यानंतर सोलापूर येथील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही असा सूचक इशारा एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे तंबी वजा इशारा काल दिला होता.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की , मी जर काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. मला अनेकांनी सांगितलं तुम्ही त्याठिकाणी जावू नका, तुमच्यावर हल्ला होईल वैगेरे बोलले पण मी त्याठिकाणी गेलो कारण मतभेद असतात, संवादाने खूप गोष्टी सुटतात असं त्यांनी सांगितले.

तसेच पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावरुन बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पण महाराजांनी बंड मोगलांविरोधात केलं होतं, सावरकरांनी इंग्रजांविरोधात बंड केलं होतं. स्वकीयांविरोधात बंड करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. घरातील भांडणं चव्हाट्यावर आणायची नसतात असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी मुंडे-खडसेंना दिला.

एका बाजूला चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंना इशारा दिला असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. स्थानिक पातळीवर जातीपातीच राजकारण केल्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गोपीनाथ गडावर त्यांनी केलेलं वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं देखील खासदार काकडे म्हणाले आहेत.

दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजप नेते बावनकुळे हे विदर्भातील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्याप्रमाणे त्यांचेही तिकीट विधानसभा निवडणुकीत कापण्यात आले होते. मात्र तरिही त्यांनी कोणतेही बंडाचे निशाण फडकवले नाही. उलट मुंडे, खडसे पक्षाच्या विरोधात नाराजी प्रकट करत असताना बावनकुळे यांनी पक्षाची बाजू उचलून धरली आहे. बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला आणि भाजपला पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. नेता हा संपुर्ण समाजाचे नेतृत्व करत असतो. जातीने कोणताही नेता मोठा होत नसतो, तर कर्तुत्वाने मोठा होतो. सध्या भाजपचे सरकार नसल्यामुळे जाती-पातीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील बावनकुळे यांनी केला.

 

Web Title:  RSS Supported Newspaper Tarun Bharat Slams BJP Leader Pankaja Munde and Eknath Khadse

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x