नाशिक : आगामी निवडणुकीत युती निश्चित मनाली जात असली तरी जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा भारतीय जनता पक्ष आणि सेनेतील कलगीतुरा रंगण्यास सुरुवात होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधीकारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यात कालच शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानल्याचं वृत्त सर्वत्र वाचण्यास मिळालं. मात्र आता शिवसेनेचा दुसरा अंक सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेनी पोस्टरबाजी करत मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर या पोस्टरमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावले असून त्यावर ‘मुख्यमंत्री शिवसेना-भाजपा युतीचाच होणार, याचा अर्थ शिवसेनेचाच होणार‘ असे लिहिले आहे.

दरम्यान या पोस्टरखाली नाशिकच्या स्थानिक नगरसेविका किरण गामणे (दराडे) यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील मुख्यमंत्री पदावरील वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यापूर्वी देखील वारंवार सेना आणि भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री आमचाच होणार अस स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणाच्या जागा जास्त निवडून येतात आणि कोण मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीचा निकालावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांना एकही आव्हान आलं नसलं तरी सेनेत मात्र आलं आहे आणि त्यावर भाजप नेमकं काय प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार, शिवसेनेची पोस्टरबाजी; मग फडणवीस?