मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ हे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा केवळ एक अफवा आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तरी देखील छगन भुजबळ यांच्या सध्याच्या हालचालींवरून भुजबळ हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकमधील शिवसैनिकांनी केलेल्या विरोधानंतर भुजबळांसाठी शिवसेनेची दारे जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसैनिकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील मधील इनकमिंग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेतेसुद्धा सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, एनसीपीचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकमधील शिवसैनिकांनी केलेल्या विरोधानंतर भुजबळांसाठी शिवसेनेची दारे जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसैनिकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सद्दी संपली आहे. ते येवला आणि नांदगावमध्ये जागा वाचवू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून, त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईत मातोश्री येथे जाऊन थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या असल्या तरी त्याबाबत स्पष्ट निर्णय न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		