13 October 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

गर्दी दिसली, माईक मिळाला..आम्ही १ महिन्यापूर्वी हे केलं, २ महिन्यापूर्वी ते केलं, ३ महिन्यापूर्वी असं केलं, साडेतीन महिन्यापूर्वी ते केलं

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागील काही दिवसांपासून सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यात शिंदे कधी गणपती निमित्त, कधी दहीहंडी, कधी दिवाळी तर कधी इतर गर्दी असेल अशा ठिकाणी आपल्या शिवसेना फोडीच्या राजकीय गाथा सांगायची संधी सोडत नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत तोपर्यंत शिंदेंच्या या गाथा जबरदस्तीने का होईना, लोकांनां ऐकाव्या लागणार आहेत असं म्हटलं जातंय.

दरम्यान, गर्दी असेल आणि माईक मिळताच ते आम्ही १ महिन्यापूर्वी हे केलं, आम्ही २ महिन्यापूर्वी हे केलं, आम्ही ३ महिन्यापूर्वी ते केलं आणि आता आम्ही साडेतीन महिन्यापूर्वी ते केलं हे पुन्हा ऐकावं लागलं आहे. सुरतमध्ये राजकीय पलायन ते गुवाहाटी पर्यटन राज्यातील लोकांनी उघड्या डोळ्याने पहिलेले असताना शिंदे तेच तेच पुन्हा सांगून कोणतं शौर्य लोकांना सांगतात तोच आता मस्करीच्या विषय झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसला तरी मुख्यमंत्री शिंदे इतर राजकीय पर्यटनात मात्र व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय.

राज्यातील प्रश्नांनिमित्त तर कधी कार्यक्रमानिमित्त. मनसेच्या दीपोत्सवसारख्या कार्यक्रमात शिंदे – फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत मंचावर उपस्थिती लावली होती. अशातच कालही एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या १२ हजार ५०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र आले होते.

अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारे टोला लगावला. ते म्हणाले, ‘12,500 वा प्रयोग झाला तुमचा. मी तीन साडेतीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं. त्याचे पडसाद आजही उमटतात. राज्यात, देशात, जगभरात उमटतात. तुमच्यासारखं आम्ही केलंच नं हे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

राज ठाकरे काय म्हणाले
राज ठाकरे म्हणाले, आताच देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला हजेरी लावून गेले. मुख्यमंत्रीही येऊन गेले. मागील काही दिवसांत आमचे दोन-चार कार्यक्रम सोबत झाले. त्यामुळे कार्यक्रमाला यावं की नाही या संभ्रमात होतो. कारण उगाच लोकांना वाटायचं की एकवर एक फ्री मिळतायत. पण प्रशांतसाठी आलो. राज ठाकरे यांनी अशी मिश्कील टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde repeated statements in every occasions check details 07 November 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x