6 May 2025 6:55 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती जालना शिपाई भरती पेपर २०१४

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘जे चकाकते, ते सोने नसते’ हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
प्रश्न
2
१०१ या संख्येतील १ या अंकाच्या स्थानिक किमतीची वजाबाकी किती?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणती संख्या ९१ ची विभाज्य संख्या आहे?
प्रश्न
5
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज = _____
प्रश्न
6
पाण्यात विळघणारी जीवनसत्वे कोणती?
प्रश्न
7
‘सभोवार’ शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी अचूक विधान निवडा?
प्रश्न
9
माध्यान्हपूर्व सव्वादहापासून माध्यान्होत्तर  २ वाजून २० मिनिटेपर्यंतचा कालावधी किती होतो?
प्रश्न
10
‘आम्ही जातो तुमच्या गावा’ हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
प्रश्न
11
१डेकामीटर म्हणजे किती मीटर?
प्रश्न
12
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस _____ येथे पडतो.
प्रश्न
13
खालीलपैकी ‘ऋ’ हा स्वर कोणता वर्ण आहे?
प्रश्न
14
ताशी १२ किमी वेगाने ६ तासात एका सायकल स्वाराने कापलेले अंतर किती?
प्रश्न
15
१ ते १५ यामधले मूळ संख्या किती आहेत?
प्रश्न
16
‘पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा’ म्हणीचा अर्थ कोणता?
प्रश्न
17
स्वातंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
प्रश्न
18
एका बाटलीत ५ मिली लिटरी औषध भरले, तर १ लिटर औषध भरण्यास अशाच प्रकारच्या किती बाटल्या लागतील?
प्रश्न
19
शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले?
प्रश्न
20
‘नो’ हा कोणता विभक्ती प्रत्यय आहे?
प्रश्न
21
खालीलसंख्या अंकांत कोणत्या प्रकारे लिहितात?नऊ लक्ष नऊ हजार नऊ
प्रश्न
22
गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
23
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान केल्या जातो?
प्रश्न
24
एका होडीचा ४/६ भाग पाण्याखाली बुडालेला आहे, तर पाण्याबाहेर होडीचा किती भाग आहे?
प्रश्न
25
जिल्हा परिषदेचा प्रशाकीय प्रमुख कोण असते?
प्रश्न
26
‘उंबराचा फूल’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
27
समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
28
जेव्हा समासात पहिले पद बहुधा सून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणा सारखा केलेला असतो, तेव्हा _____ समास असतो.
प्रश्न
29
विभक्तीचे प्रकार किती?
प्रश्न
30
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री राजेश टोपे हे खालीलपैकी कोणत्या खात्याचे कॅबिनेटमंत्री आहेत?
प्रश्न
31
५०००० + २० + १००००० + ७ + ७००० = किती?
प्रश्न
32
एका कार्यक्रमात २४ खुर्च्यांची एक रांग या प्रमाणे १२ रांगा केल्या त्यामध्ये १८८ पाहुणे येऊन बसले, तर एकूण किती खुर्च्या रिकाम्या राहील्या?
प्रश्न
33
खालीलपैकी चुकीचा गुणाकार कोणता?
प्रश्न
34
‘मागून जन्मलेला’ या शब्दाचा समूहदर्शक शब्द कोणता?
प्रश्न
35
२४८१ या संख्येला कितीने भागले असता बाकी १ उरेल?
प्रश्न
36
लखनौ करार कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
37
खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता?
प्रश्न
38
‘कोंडमारा होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
39
४३०४८, ४२५४४, ४६४८६, ४२४५४ व ४३८४४ या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात लहान व सर्वत मोठ्या संख्येतीलफरक किती?
प्रश्न
40
९५१७ मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणार या संख्येला ४ ने भाग जाईल?
प्रश्न
41
‘नमस्कार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
42
२९/६ – १३/६ = किती?
प्रश्न
43
मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात _____ म्हणतात.
प्रश्न
44
एकूण प्रवासापैकी २५ कि.मी. प्रवास बोटीने, २२० कि.मी. ५००  मीटर प्रवास रेल्वेने आणि १७५ कि.मी. ५०० मीटर प्रवास बसने केला, तर बोट व बस यांचा प्रवासापेक्षा रेल्वेने किती कि.मी. अधिक प्रवास केला?
प्रश्न
45
ज्यात १ हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती?
प्रश्न
46
‘थंडा फराळ करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
47
नामाच्या रूपात जो बद्दल होतो किंवा विकार होतो त्यास काय म्हणतात?
प्रश्न
48
मूलभूत हक्काबाबत खालीलपैकी योग्य जोडी निवडा?
प्रश्न
49
पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो?
प्रश्न
50
एका बागेत एकूण १२७५ झाडे सून त्या मध्ये ८५० आंब्याची झाडे व ७५ नारळाची झडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत. तर बगेत फणसाची झाडे किती?
प्रश्न
51
‘केवळ’ हा कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?
प्रश्न
52
महाराष्ट्र राज्यात सुपारी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
53
‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
54
शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त होतात?
प्रश्न
55
सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये स्थापन करण्यात आले आहे?
प्रश्न
56
प्रीती संगम (कराड) येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
57
देवीच्या लसीचा शोध कोणी केला?
प्रश्न
58
(९९९९+१) या बेरीजेस १० ने चार वेळा वारंवार भागले तर भागाकार किती येईल?
प्रश्न
59
आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
60
नामाच्या रुपावरुन एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे, कि स्त्री जातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्या जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे _____ म्हणतात.
प्रश्न
61
‘सूज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
62
खालीलपैकी कोणत्या संख्यातील ४ या अंकीची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
प्रश्न
63
आझाद हिंद फौजी स्थापना कोणी केली?
प्रश्न
64
एका टोपलीतील ६६ पेरूंमधून प्रत्येकांना सामान पेरूची संख्या असलेली अशी पँकेटस करायची आहेत, तर अशी जास्तीत जास्त किती पॅकेट तयार करता येतील?
प्रश्न
65
सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली?
प्रश्न
66
आपल्या मनात जसे विचार येत जातात ते जसेच्या तसे बोलून दाखविणे त्या स्वाभाविक बोलण्याला _____ मानतात.
प्रश्न
67
सामान्य सर्वनाम हे अन्य कोणत्या नावाने ओळखले जाते?
प्रश्न
68
‘अरेरे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?
प्रश्न
69
जगातील पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
प्रश्न
70
एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पर्सपांसून १२ मी. अंतरावर १००२ झाडे लावली, तर रस्त्याची लांबी किती?
प्रश्न
71
शब्दालंकार ओळखा? पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी। गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी।
प्रश्न
72
‘एकमत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
73
जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला _____ म्हणतात.
प्रश्न
74
७ व ५ या दोन्ही संख्यांनी विभाज्य असलेली खाली दिलेल्या सांख्यामधील लहान संख्या कोणती?
प्रश्न
75
‘ग्रामगीता ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या