6 May 2025 6:50 PM
अँप डाउनलोड

जिल्हा निवड समिती यवतमाळ शिपाई भरती पेपर २०१३

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
काटकोन त्रिकोणाचा कर्ण २५ व एक बाजू २० असल्यास दुसऱ्या बाजूची लांबी किती ?
प्रश्न
2
गुप्त काळात गण, नियम व श्रेणी यासारख्या व्यापार्यांच्या व उद्योगजांच्या संघटना अस्तित्वात होत्या. श्रेणींच्या कार्यकारी समितीत ……. निवडलेले प्रतिनिधी असत.
प्रश्न
3
दोन संख्या 6x आणि 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावी 168 आहे तर x = ?
प्रश्न
4
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी १९६० साली …….. येथे स्थापन करण्यात आली.
प्रश्न
5
‘चरित्र’ या शब्दातील ‘च’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.
प्रश्न
6
…… या राष्ट्रकुट राजाने ६० वर्षे इतक्या प्रदीर्घ – काळापर्यंत राज्य केले.
प्रश्न
7
जैन धर्मानुसार हे …….. सर्वात शेवटचे तीर्थकार मानले जाते.
प्रश्न
8
पुढील पदावली सोडवा. ७.०२ + ७.२ × २.२ = ?
प्रश्न
9
‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
प्रश्न
10
पुढील पैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत ?
प्रश्न
11
एक काम १२ माणसे २० दिवसात करतात, तेच काम करण्यासाठी १५ माणसे किती दिवस घेतील ?
प्रश्न
12
अल्बर्टने ८००० रु. चक्रवाढव्याजाने २ वर्षासाठी दासादसे ५ दराने मुदत ठेव ठेवली, तर मुदत संपल्यानंतर अल्बर्टला किती रक्कम मिळेल ?
प्रश्न
13
आनंदरावांची १०% तोटा सहन करून एक फ्रीज ९,०९० रुपयास विकला तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती होती ?
प्रश्न
14
वैदिक काळात सर्व देवाणघेवाण वस्तूंची अदलाबदल करून होत असे. गायीचाही वापर या कामासाठी केला जाई तथापि, ……ही नाणीही थोड्या फार प्रमाणात प्रचलित होती.
प्रश्न
15
वस्तूची किंमत २०% ने वाढली असता विक्री २०% ने कमी होते तर त्या विक्रेत्यास फायदा झाला की तोटा ?
प्रश्न
16
…… हे राष्ट्रकुटांचे मानचिन्ह होते.
प्रश्न
17
पुढील शब्दाची जात ओळखा.नुसती शाबासकी काय कामाची ?
प्रश्न
18
खालीलपैकी कुठल्या नदीचे उगमस्थान यवतमाळ जिल्ह्यातून होते ?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?
प्रश्न
20
ब्राह्मण काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रश्न
21
(घोडा) रोज खरारा करावा. कंसातल्या शब्दाचे सामान्यरूप तयार करून चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय लावा ?
प्रश्न
22
पुढील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.‘तारुण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे’
प्रश्न
23
गुप्त काळात श्रेणी सारख्या व्यापारी या उद्योजगकांच्या संघटने कडून देवळे बांधणे, विहीर खोदणे, पाणपोई चालविणे अशी कामे ही केली जात. तर मंदसोर येथील सूर्यमंदिर कोणी बांधले.
प्रश्न
24
कोणीही गडबड करू नका हे वाक्य होकारार्थी करा.
प्रश्न
25
अरुण, कुणाल आणि विनय यांनी भागीदारीत अनुक्रमे ८,००० व ४,००० व ८,००० रु. गुंतवणूक करून एक व्यवसाय केला. अरुणने ६ महिन्यानंतर भांडवल काढून घेतले, जर ८ महिन्यांच्या शेवटी ४,००५ रु. नफा झाला. तर कुणालचा वाटा किती ?
प्रश्न
26
पाय घसरला आणि पडलो. – केवल वाक्य करा.
प्रश्न
27
पुरू व भरत यांच्या एेक्यातून ……. हे नवे राष्ट्र उदयास आले.
प्रश्न
28
“मी सायंकाळी क्रीडांगणावर खेळतो. मित्रांबरोबर फिरावयास जातो.” या वाक्याचे संयुक्त वाक्य करा.
प्रश्न
29
ही सिंधू संस्कृतीमधील लोकांची प्रमुख देवता होय.
प्रश्न
30
कोणार्क येथे …… हे प्रसिद्ध मंदिर आहे.
प्रश्न
31
मौर्य काळात राजास सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपद असे. त्यामध्ये बारा ते वीस सदस्य असत. याशिवाय तीन ते चार सदस्याची एक उपसमिती असे तिला …. म्हणत.
प्रश्न
32
मधुबनी लोकचित्र कला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिध्द आहे?
प्रश्न
33
त्यांनी शत्रूवर …….. हल्ला केला. या वाक्यातील रिक्त जागी योग्य शब्दाचा उपयोग करा.
प्रश्न
34
कालीबंगण व लोथल येथील शहरांच्या सर्व बाजूंनी ….. असल्याचे केलेल्या उत्खन्नात आढळून आले आहे.
प्रश्न
35
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
36
गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा.
प्रश्न
37
मोहेंजोदडो शहराची लोकसंख्या जास्तीत जास्त ……. इतकी होती.
प्रश्न
38
४ ही संख्या ०.२ च्या किती पट आहे ?
प्रश्न
39
राम प्रत्येकी ५ रु. याप्रमाणे ४ पुस्तके विकून येणाऱ्या रकमेतून निम्मे पैसे बाजूला ठेवून २ रुपयाला १ पेन या प्रमाणे किती पेन घेऊ शकतो ?
प्रश्न
40
पुढील पर्यायांतून ‘सत्य’ या शब्दाचा विरुद्दार्थी शब्द निवडा.
प्रश्न
41
यवतमाळ जिल्ह्याचे हवामान कशा प्रकारचे आहे ?
प्रश्न
42
यवतमाळ जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहते ?
प्रश्न
43
गुणाकार करा. १३ × १८ × १८  = ?
प्रश्न
44
राहुलची पाच सामन्यांची धावांची सरासरी ५४ आहे तर सहाव्या सामन्यानंतर सरसरी ५७ झाली, तर त्याने सहाव्या सामन्यात किती धावा काढल्या.
प्रश्न
45
वैष्णव पंथीय किंवा भागवत धर्मीय ….. या ग्रंथालयातील तत्त्वज्ञान महत्वाचे मानतात.
प्रश्न
46
सुवर्णद्विपातील (जावा, सुमीत्रा, बाली व मलाया) शैलेंद्र साम्राज्याची स्थापना कितव्या शतकात झाली.
प्रश्न
47
‘शिवाजी सागर’ जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
प्रश्न
48
एका माणसाने ५० दर्शनी किंमतीचे १०% लाभांशाचे शेयर घेतले तर त्याला त्याच्या गुंतवणुकीवर १२.५ % व्याज मिळाले असते तर त्या शेयर ची खरेदी किंमत किती ?
प्रश्न
49
शब्द  प्रकार सांगा – आयोग
प्रश्न
50
सातवाहन घराण्यातील सतरावा राजा स्वत: विद्वान व साहित्यिक होता, त्याने प्रकुत भाषेतील गाथा सप्तशती नावाचा प्राकृत ग्रंथ लिहिला. त्या राजाचे नाव ……
प्रश्न
51
…….. हे यवतमाळ शहरातील महत्वाचे पिक आहेत.
प्रश्न
52
गौतमाचा जन्म ……. मध्ये झाला.
प्रश्न
53
मनस्मृती प्रमाणे खालीलपैकी कोणत्या कारणात्सव पत्नीचा त्याग करता येत नसे ?
प्रश्न
54
‘अनुस्वार’ व ‘विसर्ग’ यांना काय म्हणतात ?
प्रश्न
55
एकुण पाण्याचा हौद भरण्यास A नळास ५ तास B नळास १० तास आणि C नळास ३० तास लागतात. जर हे तिन्ही नळ एकदम चालू केले तर तो हौद किती वेळात भरेल ?
प्रश्न
56
जेथे सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले ते हडप्पा सध्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात …… या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
57
पुणे – सातारा महामार्गावर ….. हा घाट लागतो.
प्रश्न
58
लसावी काढा. ९६,१०८
प्रश्न
59
सिंधू संस्कृतीतील लोक आयात करीत असलेल्या वस्तूंमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवेश करत नसे.
प्रश्न
60
गौतमाने ज्या निरनिराळ्या अवस्थेतील व्यक्ती पाहिल्या व ज्यामुळे त्यास विरक्ती आली, अशा व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणाचा समवेश होता ?
प्रश्न
61
‘दगडावरची रेघ’ या साठी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
62
रमेशची तीन डावातील धावांची सरासरी ३२ आहे, पुडच्या डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची ५ डावातील धावांची सरासरी ४० होईल.
प्रश्न
63
सन्मती या शब्दचे विग्रह शोधा.
प्रश्न
64
घरोघरी मातीच्या चुली या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा.
प्रश्न
65
६००५ – ५००० ÷ १० = ?
प्रश्न
66
जिचा २०%, ३० रुपये आहे. तर ती रक्कम कोणती ?
प्रश्न
67
पुढील म्हणीचा अर्थ सांगा. ‘तोंड दाबून बुक्याचा मार खाणे’.
प्रश्न
68
सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द ……
प्रश्न
69
१०८ मी. ३० सें. मी. – ९८ मी. ७० सें. मी. = ?
प्रश्न
70
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यपृथकरणातील स्थान ओळखा.“गेल्या दोन महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.”
प्रश्न
71
३८७४०२ या संख्येतील ७ च्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक किती ?
प्रश्न
72
मेळघाट पयन घाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणते लेखनचिन्ह विसर्गासाठी वापरले जाते?
प्रश्न
74
गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल ?
प्रश्न
75
रिकाम्या जागी खालीलपैकी समर्पक शब्द निवडा.दुसऱ्याच्या द्वेष करणाऱ्या काही मुलींचा स्वभाव ……. असतो.

राहुन गेलेल्या बातम्या