Parenting Life | नवजात बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे होणारे फायदे जाणून घ्या

मुंबई ७ मे :बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो.
बाळाची मालिश म्हणजे काय?
बाळाची मालिश करणे म्हणजे हलक्या हाताने आणि लयबद्ध पद्धतीने बाळाच्या शरीराला चोळणे. तुम्ही तेल, क्रीम किंवा मॉइश्चरायझर वापरू शकता ज्यामुळे मालिश करणे सोपे जाईल. तुम्ही बाळाच्या छाती, पोट, पाठ, खांदे, पाय आणि डोक्याला मालिश करू शकता. बाळाला मसाज करताना गाणे गुणगुणल्याने बाळाला शांत आणि आरामदायी वाटते. बाळाला मालिश केल्याने तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात चांगल्या संप्रेरकांची म्हणजेच ऑक्सिटोसिनची निर्मिती होते. ऑक्सिटोसिनमुळे प्रेमभावना जागृत होते.
तुमच्या बाळासाठी मालिशचे फायदे:
बाळाला आपल्या आई-बाबांचा स्पर्श आवडतो आणि तुमच्या बाळाशी संवाद साधण्याचा हा एक मार्ग आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल की रडणाऱ्या किंवा त्रासलेल्या बाळाला मिठीत घेतलं, प्रेमाने गोंजारलं किंवा पाठीवर नुसता हात फिरवला तरी बाळ शांत होते. मालिश करणे म्हणजे स्पर्शाच्या पलीकडचे आहे आणि त्याचे बाळाला खूप फायदे आहेत ते खालीलप्रमाणे:
1. बाळाच्या आरोग्यासाठी बाळाला मालिश करणे चांगले आहे:
मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण सुधारते तसेच पोटाच्या तक्रारी कमी होतात. बाळाला मालिशचे खूप फायदे आहेत आणि मालिश केल्याने बाळाचे श्वसन सुधारते.
२. मालिश केल्याने बाळ शांत होते आणि बाळाला आरामदायी वाटते
बाळाला मालिश केल्याने बाळाच्या मज्जासंस्थेला आराम पडतो. तसेच बाळाला पोटाला मुरडा पडला असेल तर बाळाला आराम मिळतो व बाळ झोपी जाते. तसेच बाळाच्या त्वचेला सुद्धा पोषण मिळते.
नवजात बाळाची मालिश करताना काय काळजी घ्यावी
1. बाळाची मालिश करताना सर्वप्रथम तेल डायरेक्ट बाळाच्या शरीरावर टाकू नये. आपल्या हातावर तेल घ्यावं ते दोन्ही हातांनी मग बाळाच्या शरीरावर लावावं. असं केल्यानं तेलाचा थंडपणा बाळाला जाणवत नाही, याऐवजी आईच्या हाताची उब बाळाला तेलासोबत मिळते.
2. जेव्हा आपण बाळाला मालिश करत असू तेव्हा मालिशची सुरूवात नेहमी पायांपासून करावी. मग छाती आणि पाठीची मालिश करावी.
4. मालिशची सुरूवात नेहमी बाळाला पाठीवर झोपवून करावी. त्यानंतर बाळाला पालथं करून पाठीला मालिश करावी.
5. मालिशची एक वेळ निश्चित करून ठेवावी. ज्यावेळी एक दिवस मालिश केली असेल त्याचवेळी दररोज मालिश करावी. असं केल्यानं बाळाची झोपेची, उठण्याची आणि जेवण्याची वेळ निश्चित ठरते.
6. बाळाला मालिश केल्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच राहू द्यावं. लगेच आंघोळ घालू नये. तेल जिरू द्यावं.
7. हिवाळ्यात बाळाला मालिश करताना एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे जर खूप थंडी असेल तर बाळाला मालिश बंद खोलीत हिटर लावून किंवा कोवळ्या उन्हात बसूल करावी. कडाक्याच्या थंडीत तेल कोमट करून मग मालिश करावी. मालिश केल्यानंतर बाळाला कोमट पाण्यानं आंघोळ घालावी.बाळाला खाऊ घातल्यानंतर कधीही मालिश करू नये. त्यानं पोटावर दाब पडून बाळाला उल्टी होऊ शकते. बाळाला मालिश ही खाऊ घालण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर कमीतकमी दोन तासांनी करावी.
8. बाळाला नाजुक हातानं मालिश करावी. जोरानं मालिश करू नये. बाळाची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे हलक्या हातानंच मालिश करावी.
9. बाळाच्या डोक्याला गोल आकार देण्यासाठी मोहरीच्या उशीवर त्याला झोपवावं.
10. मग आता नवमातांनी लक्षात ठेवावं आणि बाळाची मालिश करावी, जेणेकरून आपलं बाळ सुदृढ होईल.
News English Summary: Massaging the baby is the best way to calm the baby. Massage has many benefits for baby’s health. Massage increases a baby’s blood circulation, helps with weight gain, improves digestion, and facilitates teething. Massaging your little baby expresses your love and care for your baby and also creates a bond between you and the baby.
News English Title: Benefits of baby massage news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL