1 May 2025 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला आज सकाळी स्थानिक पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. दरम्यान, पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली.

मुंबई विमानतळावर उतरता क्षणीच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पुणे पोलीस तेलतुंबडेला अटक करून पुण्याला रवाना झाले आहेत, त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार कोर्टाकडे करण्यात येणार आहे असे वृत्त आहे.

दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. परंतु ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालो नव्हतो आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा कोणताही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत त्यांच्यावरील FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या