नागपूर : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ बाहेर येताच काय करणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. परंतु सध्या राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु असून त्याचा समारोप पुण्यात १० जून रोजी होणार असून भुजबळ तेथे थेट भाषण करणार असल्याचे वृत्त आहे.

माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते म्हणून ओळखले जातात. परंतु मागील दोन वर्ष ते तुरुंगात असल्याने ते पक्षापासून काहीसे दुरावल्याचे चित्र होते. परंतु तेच भुजबळ बाहेर पडताच थेट मैदानातच उतरणार आहेत. १० जुने रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप पुण्यात होत असून भुजबळ या समारोपाच्या कार्यक्रमात जाहीर भाषण करणार आहेत.

केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच छगन भुजबळ भाषण करणार हे निश्चित झाल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

NCP Leader chhagan bhujabal to address hallbol yatra