27 July 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

ED कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? | CBI-ED'च्या कामाला काही दर्जा आहे की नाही? - सुप्रिया सुळे

MP Supriya Sule

मुंबई, २० सप्टेंबर | मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

ED कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते?, CBI-ED’च्या कामाला काही दर्जा आहे की नाही? – NCP MP Supriya Sule criticized ED and CBI actions against MahaVikas Aghadi minister :

सुप्रिया सुळे या आज औरंगाबादमध्ये आहेत. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर टीका केली. मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. पण आज रस्त्यावर चलन कटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था करण्यात आली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खोटेनाटे आरोप केल्यास त्यांचं कुटुंब कुठल्या अवस्थेतून जातात याचा विचार केला पाहिजे. तत्त्वाची लढाई आणि विरोध झाला पाहिजे. पण इतकी टोकाची कटुता निर्माण होता कामा नये. नोटीस दाखवा. रेड करा आमचं काहीही म्हणणं नाही, असं सांगतानाच आमच्या अनिल देशमुख यांच्यावर सात वेळा रेड पडली. इतक्या रेड असतात का? ईडी, सीबीआय सध्या एजन्सी नाहीत. त्यांच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला. माणूस आमच्याकडे असला की देशद्रोही आणि त्यांच्याकडे असला की धुवून निघतो, असा चिमटाही त्यांनी काढला.

ईडी कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? हे कोणत्या आधाराने बोलातात? हे काय सीपी किंवा आयजी आहेत की ईडीचे अध्यक्ष आहेत का? मग हे कसं बोलतात?, असा सवाल करतानाच पाच दशकात आमच्यावरही आरोप झाले. पण आमची तयारी आहे. इतकी कटुता येणं योग्य नाही. आमच्या विरोधात ट्रक भर पुरावे आणले पण काय झालं? असा सवालही त्यांनी केला. प्रेस हाऊसवर सुद्धा रेड होते. त्यांना नोटीस दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: NCP MP Supriya Sule criticized ED and CBI actions against MahaVikas Aghadi minister.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x