12 December 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

एवढी घाई का करताय? पुढे आयुष्यभर निवांत 'बसता' येईल ना! - आ. रोहित पवार

MLA Rohit Pawar, liquor outlets

मुंबई, ५ मे: जवळपास दीड महिन्यानंतर दारूचा थेंब घशाखाली ओतायला मिळणार या आशेने दारूच्या दुकानांसमोर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या तळीरामांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मार्मिक भाषेत शालजोडीतून टोले लगावले आहेत. जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढी घाई कसली करता? आता घरात थांबा. नंतर ‘निवांत’ बसा, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.

 

View this post on Instagram

 

एवढी घाई का करताय.? @rohit_rajendra_pawar_ #rohitpawar #rohitrajendrapawar #rohitpawarspeaks

A post shared by Rohit Pawar (@rohitpawarspeaks) on

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दारूसाठी घायकुतीला आलेल्या तळीरामांना चांगलेच चिमटे काढले आहेत. सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली आहे. पण विशिष्ट दुकानांपुढेच लागलेल्या रांगा पाहून वाईट वाटलं. मित्रांनो, जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज घरात बसा आणि तुम्हाला ‘बसायचंच’ असेल तर ‘घरच्या’ परवानगीने पुढे आयुष्यभर निवांत ‘बसता’ येईल ना!, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.

तत्पूर्वी, लॉकडाउनच्या काळात स्वस्त धान्य दुकान बंद ठेवल्याचे आढळून आले असता खुद्द रोहित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत धडक कारवाई केली. दुकानदाराकडे दुकान का बंद आहे, याची विचारणा केली असता चावी नसल्याची खोटी सबब सांगत मग्रुरपणे उडवाउडवीचे उत्तरे दिली.

यावेळी दुकानाचे कुलूप तोडण्यात आले. दुकानातील शिल्लक मालाची तपशील आणि परिस्थिती पाहता त्यांनी दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी काढली आणि प्रशासनाला तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. आमदार रोहित पवार यांच्याकडे राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. याबाबत टंचाई दौऱ्यानिमित्ताने खर्डा येथील मोहरी तलावातील पाणी साठ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलित स्वस्त धान्य दुकान गाठले होते.

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has lashed out at drinkers, who is causing a stir of social distance. The question of life and death has arisen. Why are you in such a hurry Now stay home. Then ‘sleep’, said Rohit Pawar.

News English Title: Story NCP MLA Rohit Pawar reaction on crowd at liquor outlets News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x