महत्वाच्या बातम्या
-
राम मंदिर मुद्दा: २ निवडणुकीतील शिवसेनेची दुटप्पी भूमिका लवकरच उघड करणार
सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
काय शिकावं यातून? क्रुझच्या टोकावर सेल्फी-शो; मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर पोलीस हतबल
काल मुंबई-गोवा पहिली आंग्रीया ही अलिशान क्रूझ सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, या आलिशान क्रुझच्या शुभारंभाचा कार्यक्रम भाऊच्या धक्क्यावर मोठ्या दिमाखात काल पार पडला. या उदघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या टोकावर बसून सेल्फी काढला. परंतु त्यांच्या अशा वागण्याने त्या खूप चुकीचा संदेश देऊन गेल्या आहेत. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत याचं साधं भान त्यांना नव्हतं असच म्हणावं लागेल.
7 वर्षांपूर्वी -
ठाणे महापालिकेचा आता ‘टीएमटी’ घोटाळा? त्यामुळे शिवसेनेकडून चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर
शिवसेनेची सत्ता असलेली ठाणे महानगरपालिका सत्ता घोटाळ्याच्या गरत्यात अडकण्याची चर्चा रंगली आहे. त्यात काल म्हणजे शनिवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात सुरू असलेल्या चर्चेत आलेला हा प्रस्ताव अधिक वादाच्या भोवऱ्यात सापडत असताना सत्ताधारी शिवसेनेने गोंधळ घालून चर्चेशिवाय हा संपूर्ण प्रस्ताव मंजूर केल्याने घोटाळ्याचा संशय अधिक बळावला आहे असे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना मोदींना घाबरते म्हणून सामनामधून टीका करतात: ओवैसी
बांद्रा विधानसभेच्या पोटनिवडणुकी दरम्यान काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंना पराभूत करण्यासाठी आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी एमआयएम’ने महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, मागील काही वर्षांपासून शिवसेनेवर टीका करायला जराही वेळ नसलेले एमआयएम’चे अध्यक्ष ओवैसी यांनी शिवसेनेवर दसरा मेळाव्या नंतर पुन्हा टीका करण्यास सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्यावारीसाठी शुभेच्छा, जय श्रीराम! पण या प्रश्नांची उत्तर द्या? मनसे
शिवसेना भवनाबाहेर मनसेने उद्धव ठाकरेंना पोस्टरबाजीने शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्यासोबत १० प्रश्न सुद्धा विचारले आहेत आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्नं केला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुखांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक बाजूने टीका सुद्धा करण्यात येत आहे. त्याचाच फायदा मनसे सुद्धा उचलत आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये भाजपचा धुव्वा उडण्याच्या भीतीने १०० आमदारांचा पत्ता कट होणार
पुढील महिन्यात राजस्थानसह एकूण ५ राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ३ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. परंतु निवडणूक पूर्व सर्वे निसार या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा पराभव होणार असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे मोदी सरकारने सुद्धा धास्ती घेतली असून स्वतः आरएसएस सुद्धा वेगळे सर्वेक्षण करून घेत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मेळघाट; चिलाटी या दुर्गम भागातील मैत्री या सेवाभावी संस्थेच्या केंद्राला राज ठाकरे यांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी मेळघाटातील कुपोषण आणि सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास या विषयांवर रचनात्मक कार्य करणाऱ्या मैत्री या सेवाभावी संस्थेच्या चिलाटी या दुर्गम भागातील केंद्राला राज ठाकरे यांनी भेट दिली. या संस्थेचं केंद्र चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे जवळपास ४० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
7 वर्षांपूर्वी -
विकास करण्यात फसले म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा धार्मिक राजकारण पेटवलं जाणार? - राज ठाकरेंचा ठोकताळा
विकास करण्यात फसले म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा धार्मिक राजकारण पेटवलं जाणार? – राज ठाकरेंचा ठोकताळा
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ पुरावे; अयोध्या तो बहाणा है? निवडणुकीपूर्वी इथल्या उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राजकारण: सविस्तर
आज दरवर्षी प्रमाणे शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित झाला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नेमकी कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता असली तरी त्यातून काही भरीव निष्पन्नं होईल असं राजकीय विश्लेषकांना अजिबात वाटत नव्हतं. कारण मागील ४ वर्षांपासून राजीनामा नाट्याचे इतके प्रयोग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाले आहेत की त्यात प्रसार माध्यमांना सुद्धा रस उरलेला नाही. त्यामुळे पुन्हा भाषणात सत्तेला लाथ किंवा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा झाली तरी त्याला कोणीही गांभीर्याने घेईल असे वाटत नव्हते, असच एकूण चित्र आहे. परंतु ठरल्याप्रमाणे विकासाचं राजकारण फसल्याने लोकांना सत्ताकाळात आम्ही काय केलं याचं उत्तर द्यावं लागेल म्हणून अखेर तेच राम मंदिराचं भावनिक शस्त्र अपेक्षेप्रमाणे उपसण्यात आलं आहे आणि २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी घेतलं शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन
पंतप्रधान मोदींनी अहमदनगरच्या विमानतळावर काही वेळापूर्वी आगमन झालं. काही वेळेपूर्वीच ते साई समाधी शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले आणि पूजन सुद्धा करण्यात आलं. याशिवाय आज त्यांच्या भेटीदरम्यान विविध कामांचं भूमीपूजनदेखील करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेतून कधी बाहेर पडणार? मला राजकारण शिकवायची गरज नाही: उद्धव ठाकरे
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक, पश्चिम विदर्भातील वणी आणि हिंगणघाट मनसे जिंकण्याची शक्यता: सविस्तर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी जोरदार धक्का दिला घेऊन स्थानिक कार्यकारिणी बरखास्त केली. याचवेळी शहर अध्यक्ष म्हणून पप्पू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर कार्यकारिणी येत्या काही दिवसांनी घोषित करण्यात येईल असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
संघ दक्ष! भाजप मध्य प्रदेशात तब्बल ७८ आमदारांना तिकीट नाकारणार? संघाचा सल्ला
मध्य प्रदेशातील भाजप विद्यमान ७८ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे. आरएसएस’ने केलेल्या एका सर्वेक्षणात त्या ७८ आमदारांवर मतदार प्रचंड नाराज असल्याचं समोर आल्याने आधीच धोका स्वीकार करा आणि त्यांना पुन्हा तिकीट देऊ नका, अशी सूचना आरएसएस’ने भाजपला केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश भाजपमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक केवळ दीड महिन्यावर आल्याने आणि त्यात संघाच्या या सल्ल्यामुळे भाजप अजूनच अडचणीत आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाना उद्दट वागतो, पण तो असं काही करेल हे मान्य नाही: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल त्यांची अमरावती येथे प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘मी-टू’च्या माध्यमातून जे आरोप करण्यात आले त्यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी खंबीर पाठिंबा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नागपूर - मी टू मोहिमेला अमृता फडणवीस यांचा पाठिंबा
नागपूर – मी टू मोहिमेला अमृता फडणवीस यांचा पाठिंबा
7 वर्षांपूर्वी -
भव्य! भाजपचे पुण्यवान आमदार आणि त्यांनी बांधलेल्या ४ पायऱ्यांच्या विकासाचा जागो जागी प्रचार
भाजपचे विवादित आमदार राम कदम यांची मतदारसंघातील विकासाची कामं कोणती हे शोधायचे झाल्यास एखादं शोध पथक सुद्धा कमी पडेल. परंतु कोणत्याही कामाचे प्रोमोशन शोधायचे झाल्यास त्यांच्या मतदारसंघात जागोजागी असे डॅशिंग, दयावान आणि पुण्यवान नामकरणाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स पाहायला मिळतील. त्यांच्या मतदारसंघातील भरीव अशा ४ पायऱ्यांच्या विकास कामाचा सध्या घाटकोपरमध्ये जोरदार प्रोमोशन सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
फरिदाबाद - विषय महिला सशक्तीकरण, एम. जे. अकबरांचा विषय निघताच संबित पात्रांनी पळ काढला
फरिदाबाद – विषय महिला सशक्तीकरण, एम. जे. अकबरांचा विषय निघताच संबित पात्रांनी पळ काढला
7 वर्षांपूर्वी -
मला ‘MeToo’चा अर्थच कळालेला नसून मला सुद्धा ‘मी टू’ची भीती वाटते: शिवसेना आमदार
देशभर सुरु असलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे सुशिक्षित महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण घटेल, असं मत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वक्त करत ‘मी टू’ मोहीमेमुळे महिलांचं अप्रत्यक्ष रित्या नुकसान होणार आहे असं सूचित केलं आहे. एखादी महिला ५-१० वर्षानंतर तक्रार करेल या भीतीनेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण घटेल असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना वाटतं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची आज संध्याकाळी अमरावतीत प्रकट मुलाखत; भव्य नियोजन
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. दरम्यान आज ७:३० वाजता पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH