मुंबई : सध्या देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतच चालल्याने सामान्य जनता चांगलीच हैराण झाली आहे. सामान्य जनतेचा रोष पाहता १-२ दिवसांपासून त्या किमतीत अतिक्षुष्म प्रमाणात घट करण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीवर होत असलेली तुटपुंजी कमी लक्षात घेता त्याचा सामान्यांना असून सुद्धा काहीच फायदा नाही असं चित्र आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेले महाकाय दर आणि सरकारची तडजोड म्हणजे सामान्यांसाठी ‘दर्या मे खसखस’ अशीच काही आहे. त्यावरच नेमकं राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रसिद्ध केलं आहे.
