मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीतील भाषणानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे. उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस असून त्यांना या वर्षीचा “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अवॉर्ड” देण्यात यावा अशी बोचरी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन केली आहे.
सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेकडे कोणतीही निर्णय क्षमता नसून, स्वतःच्या सरकारला जुमलेबाज सरकार म्हणणारा शिवसेना पक्षच मोठा ‘जुमला’ असल्याची खरमरीत टीका त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं थेट नाव घेत केली आहे. सत्तेत सामील होऊन शिवसेना केवळ मलिदा खाण्याचं काम करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने काय काम केले पाहिजे हे तुम्ही सांगण्याची गरज नाही, असं सुद्धा प्रतिउउतर त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
तसेच दुष्काळावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागांमध्ये प्रचंड पाणी टंचाई जाणवत असल्याची जाणीव त्यांनी सरकारला करून दिली.
