मुंबई : आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरून भ्रष्टाचाराच्या मुद्याला हाथ घालत टीका केल्याने आता मोहन भागवतांना देशद्रोही ठरवाल का असा प्रश्न करत मोदीसरकावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेना मित्र पक्ष भाजपवर टीका करण्याची एक ही संधी चुकवत नाही. नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरून भ्रष्टाचाराच्या मुद्याला हाथ घालत टीका केल्याने शिवसेनेने तोच धागा पकडत मोदीसरकारवर टीका केली आहे. संपूर्ण देशात भाजपाची सत्ता असली तरी तुमचा रिमोट कंट्रोल हा नागपूर मध्येच असतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेत असलात तरी तुमचे खरे मालक हे सरसंघचालक आहेत. परंतु देशात त्याच सरसंघचालकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्या हेतूंबाबत भाजपच्या म्हणजे मोदीसरकारच्या प्रवक्त्यांना शंका वाटते का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मोहन भागवत म्हणजे सरसंघचालकांना देशात सर्वत्र भ्रष्टाचाराचा धूर दिसतो आहे आणि तसं त्यांनी जाहीरपणे बोलूनसुद्धा दाखवलं आहे. त्यामुळे मोदीसरकार त्यांना देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी ठरवणार का असा रोखठोक सवाल केला आहे.
