3 May 2025 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

परिस्थिती चिंताजनक झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित

Deputy CM Ajit Pawar, announce lockdown, Pune and Pimpri Chinchwad

पुणे, १० जुलै : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.

देशात महाराष्ट्राची राजधानी मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत काल कोरोनाचे १ हजार २६८ नवे रुग्ण आढळले, तर ६८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८९ हजार १२४वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ५ हजार १३२ इतका झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होतेय. पुण्यात काल दिवसभरात १ हजार ५७४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार १७०वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात पुण्यात ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने येथील कोरोनाबळींचा आकडा ९७७ इतका झाला आहे.

परिणामी पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे १५ दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

अजित पवारांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा परिसरातही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येईल. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पुढील १५ दिवस पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येईल. पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता.

 

News English Summary: Lockdown has been declared once again in the entire Pune district including Pune and Pimpri Chinchwad. Deputy Chief Minister and Pune Guardian Minister Ajit Pawar has given orders in this regard. Accordingly, there will be a lockdown for the next 15 days from next Monday, i.e. from midnight on July 13.

News English Title: Deputy CM Ajit Pawar announce lockdown again in Pune and Pimpri Chinchwad News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या