महत्वाच्या बातम्या
-
पुण्यात व्हेंटिलेटर अभावी निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने मृत्यू
पुण्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्था डळमळीत झाली आहे. याचाच फटका आज पुण्यातील एका शास्त्रज्ञाला बसला असून व्हेंटिलेटरअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (६१) असे त्यांचे नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त
महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? - गिरीश बापट
पुण्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहून शहरात आणि पिंपरीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र भाजपा खासदार गिरीश बापट यांच्याकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. “मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा; पण ३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू, पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या असं म्हणत बापट यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॉमेडीयन झाले आता केतकी चितळेच्या पोस्टने पुन्हा वाद
अग्रिमा जोशुआनंदेखील कॉमेडी करताना शिवाजी महाराजांवर विनोद केले. याविषयी नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु झाली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तिने लेखी माफीनामा सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप आणि व्यापारी महासंघाचा पुण्यातील लॉकडाउनला तीव्र विरोध
पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबाबत काय करता येईल, याबाबत पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. आता पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
परिस्थिती चिंताजनक झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अभिमान आहे मी राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही - वसंत मोरे
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत २० मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण
पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
जावईशोध! Zoom App चीनी कंपनीचं, भाजप पुणे शहर अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Zoom App हे मूळचं अमेरिकन कंपनीचं असून, सदर कंपनीचं कार्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे. तसेच सदर कंपनी अमेरिकेच्या नॅसडॅकवर देखील लिस्टेड आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५९ चिनी अँप्सवर सुरक्षेच्या कारणावरून बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजही अनेकांना कोणतं अँप नेमकं कोणत्या देशाशी संबंधित आहे याची कल्पना नसावी आणि यामध्ये भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचं समाज माध्यमांवर पाहायला मिळतं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकाच्या कुटुबीयांची पवारांनी भेट घेतली
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं २५ जून रोजी निधन झालं. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादिवशी पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
पुणे हादरलं! महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार-आमदार क्वारंटाईन
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री प्रिया बेर्डे आज सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि पवारांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या भाजप आमदाराला कोरोना
पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भाजप आमदारासह त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. आमदार आणि त्याची पत्नी हे दोघे पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन एक्स्प्रेस वेवर पलटली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हा हा अपघात घडला. दरम्यान, स्वतः शरद पवार यांनी खाली उतरून जखमींची विचारपूस केली.
5 वर्षांपूर्वी -
भाषिक-प्रांतीय राजकारणात रस नाही, पण मुंबई पुण्यातील गर्दी रोखणं गरजेचं - गडकरी
कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी decongest करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी ‘झी २४ तास’च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे #e_conclave मध्ये बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्राला व्यापाऱ्याच्या क्षेत्रात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, याचा सविस्तर उहापोह केला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे ९ चिनी अधिकारी पुण्यात अडकले, त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतेय. काल (गुरुवारी) एका दिवसात राज्यात कोरोनाच्या 3 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 5 हजार 751 इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: परिस्थितीला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने पुणे जिल्हा हादरला आहे. आपल्या दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर दाम्पत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर परिसरात घडली आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE