13 December 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कोरोना आपत्ती: अघोषित संचारबंदी लागू असताना पुणे स्टेशनवर प्रचंड गर्दी; डोकेदुखी वाढणार

Corona Crisis in Pune

पुणे, २० मार्च:  मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. ४ पैकी मुंबई येथील २ तर पुणे व पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या करोना बाधित ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत.

दरम्यान, करोनाच्या भीतीने पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. रस्ते ओस पडले आहेत. दुकानं बंद आहेत. पुण्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जातं आहे. हे झालं पुण्यातलं चित्र मात्र पुणे स्टेशनवरचं चित्र याच्या अगदी विरोधातलं आहे. पुणे स्टेशनवर माणसांची तुडुंब गर्दी आहे. करोनाच्या दहशतीमुळे पुणे सोडून जाणारे लोक पुणे स्टेशनवर आज सकाळपासून गर्दी करत आहेत. तिकिटांसाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. करोनाला पळवायचं असेल तर गर्दी करु नका या आवाहनाचा या सगळ्यांना सपशेल विसर पडल्याचं दिसून येतं आहे.

मात्र पुण्यात राज्यातील विविध भागांमधील नागरिक येत असतात. तसेच पुण्यात कामानिमित्त राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे सर्व आस्थापने, तसेच दुकाने बंद झाल्याने कर्मचारी आपल्या मूळगावी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आहे. परिणामी काेराेनापासून संरक्षण करण्यासाठी गर्दी टाळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला जात असल्याचे समाेर आले आहे.

 

News English Summery:  Meanwhile, unmanned communications have been implemented in Pune for fear of coronation. Roads are dewy. Shops are closed. It is appealed to the citizens of Pune not to leave the house. This picture of Pune is in stark contrast to the picture of the Pune station. There is a crowd of people at the Pune station. People leaving Pune due to the horrors of Corona have been crowding at the Pune station since morning. Here’s a picture of queues for tickets. If you want to run away, do not rush, all these appearances seem to have been forgotten. But Pune has citizens coming from different parts of the state. Also, the number of working citizens in Pune is high. Due to the orders of the state government, all the establishments, as well as the shops were closed, the employees are leaving for their hometown. Therefore, there is a huge crowd at Pune Railway Station. As a result, the call of the Chief Minister to avoid rush to protect the caravan has come to light.

 

News English Title:  Story Corona Virus how defeat corona Pune station gone crowded by peoples News latest updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x