14 November 2019 12:03 AM
अँप डाउनलोड

मोदींच्या आणि भाजपच्या जीवावरच शिवसेना जिंकते; शिवसेनेने माफी मागावी: आ. नरेंद्र मेहता

Shivsena, BJP, Mira Bhayandar, BJP MLA Narendra Mehta, Shivsena MLA Pratap Sarnaik, Balasaheb Thackeray Smarak Fund

मीरारोड : स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या निविदा विषयाला स्थगिती दिल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. तर सभागृहाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी महापौर दालनाची तोडफोड केली.

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी बोलवण्यात आली होती. भाईंदर पूर्वेकडील आरक्षण क्र.१२२ या जागेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन बांधण्याचा ठराव १९ मे २०१७ च्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी २५ कोटी रुपयांची प्रशासकीय व आर्थिक मान्यता तसेच दालनाच्या नकाशाला नगररचना विभागाने मंजुरी दिलेली होती. तसेच आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार रवींद्र फाटक यांनी आमदार निधीतून प्रत्येकी २५ लाख असे ५० लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ७३ (क) नुसार २५ लाख रुपये रक्कमेवरील कामांच्या निविदाना मान्यता देण्याचे अधिकार स्थायी समितीला असल्याने मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या निविदेचा विषय होता परंतु सभापती रवी व्यास यांनी दालनासाठी येणाऱ्या निधीचा तपशिल प्रशासनाकडे मागितला आहे, असे सांगत हा विषय स्थगित करण्यात आला. त्यामुळे शिवसेना नगरसेवक संतापले आणि सभागृहाची तोडफोड केली.

तसेच असे काही होणार असल्याची पूर्व कल्पना असल्याने मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सभागृहाबाहेर जमा झाले होते. सभागृहात तोडफोड सुरू झाल्यावर बाहेरसुद्धा शिवसैनिकांनी शिविगाळ करत मुख्यालयात राडा घातला. तसेच महापौरांच्या दालनात घुसून महापौर दालनाची तोडफोड केली. त्यानंतर मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना आणि भाजप वाद उफाळून आला आहे.

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांवर मारहाणीचे संस्कार आहेत. पहिलं उत्तर भारतीयांना, नंतर गुजराती, मुस्लिम यांना मारहाण केली मात्र तरीही आम्ही स्वीकारलं पण महिला महापौरांना शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदरमध्ये युती ठेवायची असेल तर प्रताप सरनाईक यांनी येऊन माफी मागितली पाहिजे अन्यथा या क्षणापासून आम्ही शिवसेनेसोबत काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

बाळासाहेब ठाकरे कलादालन प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी भाजपा रखडवत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसैनिकांनी महापालिकेत महापौर दालनाची तोडफोड केली त्यावरुन भाजपा आमदार संतप्त झाले आहेत. शिवसेना भाजपाच्या आणि मोदींच्या नावावर जिंकत आली आहे. महिला महापौरांच्या केबिनमध्ये जाऊन अश्लिल शिवीगाळ केली. तोडफोड करुन जनतेच्या पैशाचं नुकसान केलं हे तुमच्या घरातले पैसे नाहीत. एकीकडे महिला सन्मानाची वार्ता करता तर दुसरीकडे अशाप्रकारे महिलेला शिवीगाळ करता. हेच संस्कार आहेत का? उद्धव ठाकरे यांनी यांच्यावर कारवाई करावी असं आमदार नरेंद्र मेहतांनी सांगितले.

तसेच बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ठराव आम्हीच केला होता त्यासाठी महापालिकेचे २ कोटी आणि उर्वरित २३ कोटी खर्च राज्य सरकार देणार होती. प्रताप सरनाईक यांनी पाच वर्षात एक दमडी आणली नाही. परंतु निवडणुकीच्या तोंडावर खोटं राजकारण करत आहेत. जनता यांना उत्तर देईल अशा शब्दात शिवसेनेवर आगपाखड केली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(340)#Shivsena(726)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या