कल्याण : मुंबईतील ‘हिमालय पूल’ दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने अखेर डोंबिवलीत धोकादायक पादचारी पुलावर हातोडा मारण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित पूल हा अंदाजे ३० ते ३५ वर्ष जुना असलेला हा पूल अतिशय जीर्ण झालेला असून ठिकठिकाणी पुलाची अवस्था जर्जर झाली आहे. दरम्यान, हा पूल पडण्यासाठी आज मध्य रेल्वेवर साडेपाच तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार असून त्याजागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.
डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल तोडून त्याजागी नव्याने पूल बांधण्याच्या निर्णयासह गणेश मंदिराकडील पादचारी पूलदेखील शुक्रवारपासून रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी बंद केला आहे. गेल्या वर्षभरापासून हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता, मात्र तरीही या पुलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं नाही. मात्र सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर गेल्या रविवारपासून या पूलाचं तोडकाम करण्यास सुरूवात केली.
