महत्वाच्या बातम्या
-
महाडमध्ये ५ मजली ईमारत कोसळली | शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या ईमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. ईमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परप्रांतीयांसमोर शिवसैनिक हैराण | कधी पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ | कधी डोकी फोडत आहेत
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उत्तर भारतीय कार्यकर्ते तुलसी सिंह राजपूत यांनी नितीन नांदगावकर यांना फोन करून अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. शिवसैनिक तुलसी सिंह राजपूत हे मूळचे उत्तर भारतीय कार्यकर्ते असून मी राजपूत असल्याचा कांगावा करत अप्रत्यक्षरित्या मराठीलाच आवाहन दिल्याचं संभाषणातून समोर आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
महावितरणला मनसे झटका | मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले
महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. अगदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही फटका बसला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान केले
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - अविनाश जाधव यांची गाडी गेटवर थांबलीच नव्हती, मग ती नोंद षडयंत्र?
मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना 1 ऑगस्टला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - ....तर मनसे कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईलने चोप देण्याचा इशारा
मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना 1 ऑगस्टला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधवांना २ दिवसांची पोलीस कोठडी, महाराष्ट्र सैनिकांची एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी
मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना आज (1 ऑगस्ट) ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणाऱ्या अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस
यापूर्वी मोदींच्या कारभारावर हिटलरशाहीचा आरोप करणाऱ्या ठाकरेंचा कारभार सुद्धा त्याच हिटलरशाहीच्या दिशेने जाताना दिसत आहे. कारण कोरोना आपत्तीत सुद्धा प्रशासनातील उन्मत्त अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे काणाडोळा करत सामान्य रुग्णांचे प्रश्न मांडणाऱ्या विरोधकांना तडीपारीची नोटीस पाठविण्याचं शौर्य ठाकरे सरकार दाखवत आहे असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे: रुग्णांवर भरमसाट बिल आकारणाऱ्या खाजगी इस्पितळाचा परवाना रद्द
जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ५२४ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७५ हजार ४४६ वर पोहोचली आहे. तर, दिवभरात ३७ करोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा २ हजार ८३ इतका झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना इंजेक्शन असो की ई-पास...बिनधास्तपणे काळाबाजार
कोरोनाचा रुग्ण हा क्रिटिकल अवस्थेत आल्यावर त्याला देण्यात येणारे टोलसीझुबम हे महागडे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकणाऱ्या उल्हासनगरातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला फूड अँड ड्रग्ज शाखेने सापळा रचून गजाआड केले आहे. यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नालासोपारा स्थानकात ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा हंगामा, लोकलमधून प्रवासाची मागणी
आम्हाला लोकलमधून प्रवास करू द्या’, अशी मागणी करत आज नालासोपारा रेल्वे स्थानकात सर्वसामान्य प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रवाशांचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले. प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून मोठा हंगामा केला होता. दरम्यान, या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
व्यक्ती एकंच, सरकारी लॅबच्या कोविड रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून विक्री, मराठी युवकाचा 'Next Fresh' ब्रॅण्ड नफ्यात
जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्मचारी महिला पदवीधर टंकलेखक, पालिका आयुक्त सांगायचे घरी झाडू-भांडी घासायला
पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना अपशब्द केल्याप्रकरणी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला विरार पोलिसांनी काल अटक केली होती. मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन करत पालिका आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे पालिका: मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याने रुग्णांना PPE किट निम्या दरात
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी करोनाचे १ हजार ५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकुण संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न राबवा ही सूचना आ. राजू पाटील यांनी १० एप्रिलला दिली होती, सरकारला जुलैमध्ये जाग
कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धारावीची दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेऊन शाबासकी दिल्यानंतर आता धारावीचा हा पॅटर्न कल्याण-डोंबिवली महापालिकाही राबवणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीच ही माहिती दिली आहे. धारावी पॅटर्नने हाताबाहेर गेलेला कोरोना महापालिका रोखणार आहे. त्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
वसई-विरार महापालिका आयुक्तांवर अविनाश जाधव का संतापले? सविस्तर वृत्त
वसई विरार महापालिकेला तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले होते. धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली हप्ते. मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव थांबेना, ठाण्यातही लॉकडाऊन वाढवला
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
निगेटीव्ह रुग्णावर कोरोनाचे उपचार, ३ लाख फक्त महागड्या इंजेक्शनवर खर्च
कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News