1 May 2025 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL
x

ठाण्यात अनेक सामाजिक संघटनांचा शिवसेनेवर आरोप करत राष्ट्रवादीला पाठिंबा

Anand Parajpe, Shivsena, Rajan Vichare, NCP

ठाणे : देशात २०१४ साली बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु, मागील ५ वर्षांत भाजप सरकार फेल ठरले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कधी बोलले गेले नाही. त्यातही युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा आताचा वचननामा पाहून तर भ्रमनिरास झाला. सलग पंचवीस वर्षे सत्तेवर असतानाही शिवसेनेने ठाण्याची वाट लावली, त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय ठाण्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी घेतला आहे.

ठाण्यात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, विश्वास उटगी, जगदीश खैरालिया, मतीन शेख आदी उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात आमचे प्रश्न ऐकून घेतले जायचे, त्यावर चर्चा व्हायची. या पाच वर्षांत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी सरकारदरबारी चर्चा झालेली नाही आणि झाली असलीच, तरी त्याची अंमलबजावणी परंतु झालेली नाही. मोदी सरकारची सुरू असलेली वाटचाल लोकशाहीची हत्या आणि अभिव्यक्तीचे हनन करण्यासाठी आहे, असे वाटते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युतीला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील ४८ उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत आहोत, असे मत डॉ. संजय मं.गो. यांनी व्यक्त केले. ठाण्यात तरुणांची बेरोजगारी, एन्व्हॉयर्नमेंटल कन्सल्टंट, पाण्याची व्यवस्था आणि क्लस्टर हे प्रश्न असून आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी ते सोडवावे, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

सध्या मोदींची पावले हुकूमशाहीकडे वळलेली आहेत. कामगार, शेतकरी एकूणच सर्वसामान्य जनता असुरक्षित आहे. नोटाबंदीमध्ये याच कामगार, शेतकरी, छोट्या दुकानदारांचे खूप नुकसान झाले आणि प्रत्यक्षात काळे पैसेवाल्यांचा फायदा झाला. आज हुकूमशाहीकडे जाणारी पावलं अर्थात काही दोनतीन माणसे जो निर्णय घेतात आणि संसदेला, सर्वोच्च न्यायालयाला टांगून ठेवतात, हे चुकीचं आहे. अजित डोवाल हे तर राष्ट्रीय सल्लागार आहेत की, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार आहेत, हा एक प्रश्नच आहे, असे विश्वास उटगी म्हणाले. नंदलाल समितीच्या भ्रष्टाचारात राजन विचारे अडकलेले होते. त्यामुळे अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या माणसाला निवडून देऊ नये, असे जगदीश खैरालिया म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या