6 May 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. राष्ट्रवादीसोबत बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक सुरू आहे. मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत हे 3 खासदार आले आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंनी फ्लोअर टेस्टमध्ये भाजपला पाठिंबा द्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. या मागणीला राज ठाकरेंनी होकार दिला आहे अशी माहिती समोर आली आहे. मनसेचा एक आमदार विधानसभेत आहे. त्याचं बळ विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी भाजपला मिळणार आहे.

राज्यात ठाकरे विरूद्ध शिंदे असा सत्तासंघर्ष पाहण्यास मिळतो आहे. एकनाथ शिंदे हे २१ तारखेला ३० हून अधिक आमदारांसह आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. आता हे सगळे आमदार आधी गोव्यात आणि मग मुंबईत परतणार आहेत. सध्या एकनाथ शिंदेंकडे ५१ आमदारांचं बळ आहे. हे सगळे आमदार मुंबईत गुरूवारी परतणार आहेत. सत्ता नाट्यात पुढे काय काय घडतं फ्लोअर टेस्ट होते की नाही? फ्लोअर टेस्ट झाली तर त्यात सरकार पडणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुरूवारी मिळणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS party MLA will support BJP during floor test check details 29 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x