27 April 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत
x

रणजी ट्रॉफी; विदर्भ सलग दुसऱ्यांदा ‘फायनल’मध्ये

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेत विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा इंटिम फेरी गाठली आहे. जलद गोलंदाज उमेश यादवच्या तुफान गोलंदाजीच्या बळावर विदर्भ संघाने हा पराक्रम केला आहे. दरम्यान, उमेश यादव याचे बारा बळी आणि फैझ फझलच्या एकूण ७५ धावांच्या बळावर उपांत्य सामन्यात केरळवर एका डावाने विजय प्राप्त केला. तसेच उमेशने पहिल्या डावात केवळ ४८ धावांच्या मोबदल्यात तब्बल ७ फलंदाजांना तंबूत परतवले. आज पर्यंतच्या इतिहासातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ही त्याची सर्वात उत्तम कामगिरी आहे.

दरम्यान, या सामन्यात उमेशने घेतलेल्या ७ बळींच्या जोरावर विदर्भाच्या संघाने केरळचा पहिला डाव केवळ १०६ धावांवर रोखला. त्यानंतर सलामीवीर फैज फेजलाच्या ७५ धावांच्या जोरावर विदर्भाने एकूण २०८ धावा पूर्ण केल्या. त्यानंतर सुरु झालेल्या दुसऱ्या डावात पुन्हा केरळचा संघ गडगडला. उमेश यादव आणि यश ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावर केरळचा डाव केवळ ९१ धावांत आटोपला. तब्बल १२ फलंदाजांना तंबूत घडणाऱ्या उमेश यादवला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x