3 May 2025 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

शिवसेनेच्या कृपेमुळे रॉयल 'मर्सिडीज' लाईफ जगणाऱ्या पिता-पुत्राची राजकीय स्वार्थाने आदित्य ठाकरेंवर मर्सिडीज वरून टीका

MP Shrikant Shinde

MP Shrikant Shinde | आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीकरणासाठी आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता तर खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

बंडखोरी केलेल्या आमदारांवर गद्दार हा शिक्का :
बंडखोरी केलेल्या आमदारांवर गद्दार हा शिक्का पडलेला आहे. मात्र, नेमके गद्दार कोण हे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून पटवून सांगितले जातेय. शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे गद्दारच असल्याचे आदित्य ठाकरे सांगत आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मांडीला-मांडी लावून बसणारेच खरे गद्दार असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवाय ज्यांचे दाऊदसोबत संबंध त्यांच्याशी युती करणे बाळासाहेबांना पटले असते का असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीत. हिंदुत्वाचा प्रचार आणि त्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे. असे असताना आता त्यांच्याच विचाराला बाजूला सारण्याचा घाट शिवसेनेत सुरु झाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने शिंदे गटच पुढे घेऊन जात आहे. तर हे सर्वसामान्य जनतेलाही मान्य असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुनही आता राजकारण वाढत आहे.

शिंदेंचं वास्तव काय :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ‘रिक्षाच्या आडून’ स्वतःचं राजकीय मार्केटिंग करत असले तरी एकनाथ शिंदे हे स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आंनद दिघे यांचं नाव पुढे करून मोठं शाही आयुष्य जगतात हे वास्तव आहे. त्यांनी शिवसेनेत मिळालं सगळं उघड्या डोळ्याने दिसतं हे देखील वास्तव आहे. मात्र आज ते ठाकरेंना बदनाम करण्यासाठी आणि स्वतःला सामान्य भासविण्यासाठी मोठं मार्केटिंग करत असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीत असताना स्वतःकडे असलेल्या खात्याच्या विकास कामांचा आढावा देखील ते अशाच खाजगी आलिशान गाड्यातून घ्यायचे. त्याचा प्रत्यय समृद्धी महामार्गाच्या पाहणीत लोकांनी उघड्या डोळ्याने पाहिला होता. त्याचे खालील व्हिडिओ पुरावे देखील उपलब्ध आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Shrikant Shinde targeting Aaditya Thackeray check details 23 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या