2 May 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

2022 Mahindra XUV300 | 2022 महिंद्रा एक्सयूव्ही300 टीझर रिलीज, लवकरच होणार लाँच, जाणून घ्या सर्वकाही

2022 Mahindra XUV300

2022 Mahindra XUV300 | भारताची एसयूव्ही निर्माता कंपनी महिंद्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर फेसलिफ्टेड एक्सयूव्ही300 चा टीझर प्रदर्शित केला आहे. लवकरच एक्सयूव्ही300 भारतात लाँच होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही पहिल्यांदा फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि त्यानंतर कोणतीही मोठी अपडेट झालेली नाही. आगामी २०२२ महिंद्रा एक्सयूव्ही ३०० फेसलिफ्टमध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल केले जाण्याची अपेक्षा आहे. यासोबतच यामध्ये नव्या फिचर्ससह अधिक पॉवरफुल टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर मिळण्याची शक्यता आहे.

डिझाईन कशी असेल:
डिझाईनच्या बाबतीत, फेसलिफ्ट केलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही 300 च्या फ्रंटला अपडेट केले जाऊ शकते. यात रि-स्टाइल बंपर आणि ग्रिल मिळेल. याशिवाय यामध्ये महिंद्राचा एक्सयूव्ही ७००, स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक असा नवा ‘ट्विन पीक्स’ लोगो मिळू शकतो. इतर बदलांमध्ये नवीन मशीन-कट अलॉय व्हील्सचा समावेश असेल. आतील बाजूस, एक्सयूव्ही 300 फेसलिफ्टमध्ये किरकोळ फीचर अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे.

हे फीचर्स असू शकतात :
फीचर्सच्या बाबतीत महिंद्रा एक्सयूव्ही 300 मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आली आहे. सध्या या एसयूव्हीमध्ये 108 बीएचपी 1.2 लीटर टर्बो पेट्रोल मोटर आणि 115 बीएचपी 1.5 लीटर डिझेल युनिट असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड एएमटीचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 2022 Mahindra XUV300 will be launch soon check details 23 August 2022.

हॅशटॅग्स

#2022 Mahindra XUV300(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x