10 May 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Total Gas Share Price | तज्ज्ञांकडून BUY कॉल, अदानी टोटल गॅस शेअर फोकसमध्ये, अपडेट नोट करा - NSE: ATGL Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Multibagger Mutual Funds | हे फंड 100 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत, पैसा दुपटीने वाढवणाऱ्या फंडाची नावं सेव्ह करा

Multibagger Mutual Funds

Multibagger Mutual Funds | फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडाला डायनॅमिक इक्विटी फंड असेही म्हणतात. यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स अशा विविध मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये फंड हाऊस गुंतवणूक करू शकते. येथे आम्ही शीर्ष 2 फ्लेक्सी-कॅप फंडांवर चर्चा करणार आहोत, ज्यांना रेटिंग एजन्सी क्रिसिलने सर्वोत्कृष्ट दर्जा दिला आहे. या फंडांनी गुंतवणूकदारांना शंभर टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पुढील संपूर्ण तपशील जाणून घ्या.

एचडीएफसी फ्लेक्झी कॅप फंड :
डायरेक्ट प्लॅन एचडीएफसी फ्लेक्झी कॅप फंड हा फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीचा पर्याय असून ११५८.५१ कोटी रुपयांचा एनएव्ही आणि २९०९६.४२ कोटी रुपयांचा आकार आहे. याशिवाय फंडाचे खर्चाचे प्रमाण (ईआर) १.०६ टक्के आहे. पोर्टफोलिओमधील त्याच्या पहिल्या पाच शेअर्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. क्रिसिलने या फंडाला 5 स्टार रेटिंग दिले आहे.

एचडीएफसी फ्लेक्झी कॅप – एसआयपी रिटर्न्स :
गेल्या 1 वर्षात एसआयपी रिटर्न्स (निरपेक्ष परतावा) 10.77 टक्के होता. गेल्या दोन वर्षांत 31.03 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या 3 वर्षात 50.96 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या 5 वर्षात 60.95 टक्के रिटर्न दिले आहेत. त्याचा एसआयपी वार्षिक परतावा गेल्या दोन वर्षांत २८.३९ टक्के आणि गेल्या तीन वर्षांत २८.६५ टक्के राहिला आहे. तसेच या फंडाचा गेल्या 1 वर्षात वार्षिक परतावा 20.53 टक्के राहिला आहे.

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप – म्युच्युअल फंड रिटर्न्स:
गेल्या वर्षभरात या म्युच्युअल फंड योजनेचा परतावा २१.०३ टक्के होता. गेल्या दोन वर्षात 82.35 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या 3 वर्षात 80.26 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या दोन वर्षांत त्याचा वार्षिक परतावा ३५.०४ टक्के होता, जो श्रेणीच्या सरासरी परताव्यापेक्षा २६.०७ टक्के अधिक आहे. याशिवाय गेल्या 3 वर्षात त्याचा वार्षिक परतावा 21.64 टक्के राहिला आहे, तर श्रेणीची सरासरी 20.82 टक्के राहिली आहे.

पीजीआयएम इंडिया फ्लेक्सी कॅप फंड – डायरेक्ट प्लान:
पीजीआयएम इंडिया फ्लेक्झी कॅप फंड हा फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक असून २८.३२ कोटी रुपयांचा एनएव्ही आणि ४७६१.३५ कोटी रुपयांचा आकार आहे. याशिवाय फंडाचा ईआर ०.३२ टक्के आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये पहिल्या पाच समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, अॅक्सिस बँक लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. क्रिसिलने या फंडाला ५ स्टार रेटिंग दिले आहे.

पीजीआयएम इंडिया फ्लेक्सी कॅप – एसआयपी रिटर्न्स:
गेल्या एका वर्षात एसआयपी रिटर्न (निरपेक्ष परतावा) १.२२ टक्के होता. गेल्या दोन वर्षांत १९.२९ टक्के परतावा दिला. गेल्या 3 वर्षात 47.90 टक्के रिटर्न दिले. गेल्या 5 वर्षात 72.50 टक्के रिटर्न दिले. गेल्या दोन वर्षांत एसआयपीकडून त्याचा वार्षिक परतावा १७.९७ टक्के आणि गेल्या तीन वर्षांत २७.१४ टक्के होता. पण बाजारातील मंदीच्या ट्रेंडमुळे या फंडाचा वार्षिक परतावा गेल्या १ वर्षात २.२६ टक्के होता. गेल्या वर्षभरात या म्युच्युअल फंड योजनेचा परतावा १.९८ टक्के इतका झाला आहे. गेल्या दोन वर्षांत ६९.९९ टक्के परतावा दिला. गेल्या 3 वर्षात 117.68 टक्के रिटर्न्स दिले असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Mutual Funds which gave huge return check details 29 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Funds(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या