3 May 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

Samsung Galaxy A04s | सॅमसंगचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी A04s लाँच, 50 MP कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स पहा

Samsung Galaxy A04s

Samsung Galaxy A04s | सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी A04s जागतिक बाजारात लाँच केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट हँडसेट नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी A04 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या गॅलेक्सी A03 चा हा उत्तराधिकारी असल्याचेही म्हटले जात आहे. कंपनीने फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरा :
दरम्यान हा स्मार्टफोन जगातील काही देशांमध्ये सॅमसंगच्या वेबसाइटवर लिस्टेड केले गेले आहे. ब्लॅक, ग्रीन, व्हाइट आणि कॉपर कलर ऑप्शनमध्ये येणारा हा फोन लवकरच भारतातही तो उपलब्ध होऊ शकतो. फोनमध्ये कंपनी 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह अनेक शानदार फीचर्स देत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
फोनमध्ये कंपनी 6.5 इंचाचा एचडी + आयपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले ९० हर्ट्जचा रिफ्रेश रेट आणि गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. सॅमसंगने हा फोन ३ जीबी आणि ४ जीबी रॅम ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनी 32 जीबी, 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन ऑफर करत आहे. फोनच्या प्रोसेसरबाबत कंपनीने केवळ ऑक्टा-कोर चिपसेट असल्याची माहिती दिली आहे.

ऑक्टा-कोर प्रोसेसर एक्सिनॉस 850 :
फोनमध्ये देण्यात आलेला हा ऑक्टा-कोर प्रोसेसर एक्सिनॉस 850 असू शकतो. मायक्रो एसडी कार्डला १ टीबीपर्यंत सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्ससह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी कंपनी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर :
साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसचा विचार केला तर सॅमसंगचा हा फोन अँड्रॉयड 12 वर आधारित वनयूआय 4.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३.५ एमएम हेडफोन जॅक, ड्युअल सिम, ४जी, वाय-फाय 5 आणि ब्लूटूथ 5 आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Samsung Galaxy A04s Smartphone launched check price in India 31 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Samsung Galaxy A04s(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या