3 May 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Realme Narzo 50i Prime | रिअलमी नार्जो 50i Prime स्मार्टफोन भारतात लाँच, बजेट स्मार्टफोन आणि तगडे फीचर्स मिळणार

Realme Narzo 50i Prime

Realme Narzo 50i Prime | रियलमीने आपला नवा स्मार्टफोन नार्जो 50 आय प्राईम मंगळवारी भारतात लाँच केला आहे. बजेट रेंजचा हा फोन नुकत्याच लाँच झालेल्या रेडमी ए वन फोनला तगडी स्पर्धा देऊ शकतो. स्टेज लाइट डिझाईनमधील सर्वात स्टायलिश एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन रियलमी नार्जो 50ई प्राइमची किंमत 7,999 रुपयांपासून सुरू होते. साधारण वर्षभरापूर्वी भारतात लाँच करण्यात आलेल्या रियलमी नार्जो ५० आय फोनचे हे हलके व्हर्जन आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे.

फीचर्स :
रियलमी नार्जो 50 आय प्राइम फोनचा डिस्प्ले साइज 6.5 इंच आहे. यात वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. रियलमीने डिस्प्लेच्या रिझॉल्यूशनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. असा अंदाज आहे की डिस्प्ले ७२० पिक्सल आहे. फोनचा ब्राइटनेस ४००निट्स आहे. सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये ऑक्टा-कोर युनिसोक टी ६१२ प्रोसेसर दिला आहे. यात ४ जीबी एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि ६४ जीबी पर्यंत यूएफएस २.२ स्टोरेज आहे. फोनची स्टोरेज क्षमता वाढवता येऊ शकते. यासाठी फोनमध्ये मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. अँड्रॉइडच्या जुन्या व्हर्जन अँड्रॉईड ११ वर आधारित रियलमी यूआय आर एडिशन सॉफ्टवेअरवर हा फोन काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५,० एमएएचची बॅटरी असून, चार्ज करण्यासाठी १० वॉट मायक्रो-यूएसबी चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.

किंमत आणि उपलब्धता :
भारतात रियलमी नार्जो ५० आय प्राइम स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरू होते. फोनचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या फोनच्या ३ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटला 7,999 रुपयात खरेदी करता येईल आणि ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

कधी खरेदी करू शकतील :
अॅमेझॉन प्राईम मेंबर्स हा फोन एक दिवस आधी म्हणजे २२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ नंतर खरेदी करू शकतील. २४ तासांनंतर म्हणजे २३ सप्टेंबरच्या दुपारी कोणताही ग्राहक हा फोन रियलमी वेबसाइट, अॅमेझॉन ऑनलाइन स्टोअर, जिओ स्टोअर आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकणार आहे. हा फोन डार्क ब्लू आणि मिंट ग्रीन या दोन रंगात उपलब्ध असेल. नव्या फोनच्या लाँचिंगशी संबंधित आणखी एक बातमी आहे. रिअलमी या आठवड्यात १६ सप्टेंबर रोजी आणखी एक फोन रियलमी जीटी निओ ३ टी भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Realme Narzo 50i Prime smartphone launched Amazon India check details 14 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Realme Narzo 50i Prime(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या