3 May 2025 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

 Thank God | बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत बॉयकॉटचा ट्रेंड सुरु, Thank God चित्रपट बॉयकॉटच्या भोवऱ्यात, स्टार कास्टची फी घ्या जाणून

Thank God

 Thank God Movie | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत बॉयकॉटचा ट्रेंड सुरु असतानाच, आता या अजय देवगणचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘थँक गॉड’ चित्रपटामध्ये अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुलप्रीत सिंग मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या चित्रपटासाठी बहिष्कार टाकला जात आहे. कारण. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे यात अजय देवगण चित्रपगुप्ताचे पात्र निभावत आहे तर त्याच्या मागे उभ्या असणाऱ्या मुली या अर्धनग्न असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे हिंदु लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चित्रपटाचे बजेट कोटींच्या घरात
वादात अडकलेल्या या चित्रपटाचे आणि स्टार कास्टचे बजेट ऐकुन तुम्ही थक्क व्हाल. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. दरम्यान, ‘थँक गॉड’ चित्रपट बॉयकॉट ट्रेंडच्या कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटामधील चित्रगुप्त अर्थातच अजय देवगणची भूमिका लोकांना खटकली आहे. मात्र, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, वादांनी घेरलेल्या या चित्रपटाचे बजेट 60-70 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

‘थँक गॉड’ मधील सिनमुळे चित्रपट वादात
दरम्यान, चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली चित्रगुप्तयांची सभा पाहून लोकांना प्रश्न पडत आहेत की, चित्रगुप्ताची आधुनिक राज्यसभा बांधण्यासाठी इतका पैसा खर्च करता येईल का? स्टारकास्टची फी सुद्धा या बजेटमध्ये जोडली गेली आहे. या चित्रपटासाठी अजय देवगणने 35 कोटी रुपये घेतले आहेत. तर सिद्धार्थ मल्होत्राला 7 कोटी रुपये आणि रकुल प्रीत सिंगला यासाठी फक्त 3 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: The fee of the star cast of the film Thank God has come to the fore Checks details 17 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Thank God(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या