6 May 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

भाजप मंत्र्यांची 'सुसाट' फेक-ट्रेन, त्यावर तत्पर प्रवक्ते, तर भक्तांचं 'ओन्ली मोदीजी'

नवी दिल्ली : समाज माध्यमांवर आज जी खोट्या प्रचाराची बीज रोवली गेली त्याला सर्वाधिक कारणीभूत म्हणजे भारतीय जनता पक्ष असंच म्हणावं लागेल. अनेक सुशिक्षित तरुणांना देखील त्यांच्या सामाजिक तसेच राजकीय अज्ञानाचा फायदा घेत खोट्या व्हिडिओ आणि एडिटेड गोष्टींच्या आधारे सत्ताधाऱ्यांनी मूर्ख बनवलं आहे. त्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा आणि त्यांच्या आयटी सेलचा मोठा वाटा आहे. आजही त्याच खोट्या गोष्टींच्या आधारे लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रकार खुलेआम सुरु आहेत.

तसाच काहीसा प्रकार रेल्वे आणि अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याकडून करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की “हा काही पक्षी नाही किंवा विमान नाही… ही आहे ‘मेक ईन इंडिया’ अंतर्गत भारतात बनवलेली सेमी हायस्पीड ट्रेन “वंदे भारत एक्सप्रेस” आणि आपण जेव्हा हा व्हिडिओ बघतो तेव्हा खरंच य़ा ट्रेनचा स्पीड बघून अवाकच होतो…..

पण खरी गंमत अशी आहे कि, सदर व्हिडिओ यूट्यूब’वरून डाउनलोड करून त्या व्हिडिओमधील ट्रेनच्या मूळ स्पीडमध्ये जवळपास दुप्पट वाढ करून तो रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केला आणि त्यावर ‘पक्षी-विमान’ असे शब्दप्रयोग जोडले. खऱ्या व्हिडिओ जो स्पीड आहे तो पियुष गोयल यांनी दाखवल्यापेक्षा निम्मा आहे. पण कहर म्हणजे त्या खोट्या व्हिडिओवर देखील देशातील हजारो भक्तांनी म्हणजे सर्वज्ञानी लोकांनी रिट्विट करत ‘ओन्ली मोदीजी’ असा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्थात हे असले प्रयोग ‘ओन्ली’ मोदी आणि त्यांचे मंत्रीच करू शकतात.

हा आहे पियुष गोयल यांनी पेरलेला आणि स्पीड दुप्पट करत शेअर केलेला खोटा व्हिडिओ;

आणि हा आहे त्या ट्रेनचा खरा आणि खऱ्या स्पीडचा व्हिडिओ;

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x