4 May 2025 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

Tecno Pova Neo 5G | टेकनोचा पोवा निओ 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरीसह मिळणार अनेक फीचर्स, बजेट किंमत

Tecno Pova Neo 5G

Tecno Pova Neo 5G ​​| टेकनोचा नवा पोवा निओ 5जी स्मार्टफोन शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 810 एसओसीचा प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १३-बँड ५ जी सपोर्ट दिला आहे. या हँडसेटमध्ये 6,000mAh ची मजबूत बॅटरी आहे, ज्यात चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Tecno Pova Neo 5G स्मार्टफोनची किंमत :
बजेट रेंजच्या या स्मार्टफोनची किंमत १५,४९९ रुपये आहे. टेक्नोचा हा हँडसेट स्प्रिंट ब्लू आणि नीलम ब्लॅक अशा दोन रंगात उपलब्ध आहे. सध्या या फोनच्या खरेदीसाठी प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. रिटेल स्टोअर्समधून प्री-बुकिंग करता येते. टेकनो पोवा निओ 5जी स्मार्टफोनची विक्री 26 सप्टेंबर 2022 पासून भारतात होणार आहे.

फीचर्स :
टेक्नोच्या या नव्या स्मार्टफोनला ड्युअल सिम-नॅनोचा सपोर्ट आहे. फोनचा डिस्प्ले साइज 6.8 इंचाचा आहे. फोनमध्ये फुल एचडीसह एलटीपीएस डिस्प्ले दिला जात आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे आणि रिझॉल्यूशन 1,080X2,460 पिक्सल आहे. टेकनो पोवा निओ ५जी स्मार्टफोनचा टच सॅम्पलिंग रेट २४० हर्ट्ज आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 जीपीयूसोबत मीडियाटेक डायमेनसिटी 810 एसओसीचा प्रोसेसर दिला आहे. यात अँड्रॉइड १२ वर आधारित हाय ओएस ८.६ ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. टेकनो पोवा निओ ५जी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा ५० एमपी एआय आहे. रियर कॅमेरा सेटअपसह क्वॉड फ्लॅश देखील आहे. या मदतीने 2K रिझॉल्यूशनचा व्हिडिओ कॅप्चर करता येईल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/ २.० अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

मेमरी फ्यूजन फीचरमुळे 7 जीबीपर्यंत वाढणार रॅम क्षमता :
फोनची रॅम आणि स्टोरेज क्षमता वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. आणखी ३ जीबी मेमरी फ्यूजन रॅम फीचरच्या मदतीने याची क्षमता वाढवता येऊ शकते. यापूर्वी यात १२८ जीबी स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने याला १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 2.4GHz ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ व्ही 5.0 चा सपोर्ट दिला आहे. चांगल्या आवाजासाठी डीटीएस ऑडिओ तंत्रज्ञानाने सुसज्ज ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. फोनची सुरक्षा अनलॉक करण्यासाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर लावण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tecno Pova Neo 5G smartphone launched check price details 24 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tecno Pova Neo 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या